शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या निधनानंतर ती तब्बल ४२ हजार किलोमीटर धावली, गिनीज रेकॉर्ड करत दिला अनोखा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 17:59 IST

अँजेला टॉर्टोरिस या महिलेने २०१३ मध्ये अँजेलाने १२९ मॅरेथॉनमध्ये (Marathon) सहभाग घेतला. एका वर्षात सर्वाधिक मॅरेथॉन धावणारी महिला म्हणून तिला ओळखलं जाऊ लागलं. ही महिला आतापर्यंत अमेरिकेतील जवळपास सगळ्या राज्यात किमान ५ वेळा मॅरेथॉन धावली आहे.

आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचं गंभीर आजाराने निधन झालं तर आपण खचून जातो. पण काही लोक यातून बाहेर पडतात. इतकंच नाही तर इतरांना जागृत करण्यासाठी प्रयत्न करतात. असंच अमेरिकेतील एका महिलेने केलं. अँजेला टॉर्टोरिस (Angela Tortoris) या महिलेच्या पतीचं गंभीर आजाराने निधन झालं. त्यानंतर अँजेला टॉर्टोरिसने आपल्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यायला सुरूवात केली. तब्बल ४२ हजार किलोमीटर धावली. यातून तिने आरोग्याबाबत जनजागृतीही केली. तिच्या कृतीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Records) नोंद केली गेली. अँजेला टॉर्टोरिस या महिलेने २०१३ मध्ये अँजेलाने १२९ मॅरेथॉनमध्ये (Marathon) सहभाग घेतला. एका वर्षात सर्वाधिक मॅरेथॉन धावणारी महिला म्हणून तिला ओळखलं जाऊ लागलं. ही महिला आतापर्यंत अमेरिकेतील जवळपास सगळ्या राज्यात किमान ५ वेळा मॅरेथॉन धावली आहे.

या रेकॉर्डविषयी अँजेला म्हणते” मी सध्या केवळ धावते आहे. माझ्या सुटीच्या दिवशीही मी हेच काम करते. माझ्या पतीच्या निधनानंतर मी याबाबत जागरुक झाले आणि आता इतरांना याविषयी मी जागृत करत आहे” अँजेला म्हणाली आहे.

पतीला होता गंभीर आजारअँजेला टॉर्टोरिसच्या पतीला मल्टीपल स्क्लेरोसिस हा आजार झाला होता. तेव्हापासून ती आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला लागली. तिला आपल्या या आजाराबद्दल लोकांना जागरुक करायचं होतं. त्यामुळे तिने मॅरेथॉन धावण्यास सुरुवात केली. सोबतच तिला स्वतःला तंदुरुस्त ठेवायचं होते. मल्टिपल स्क्लेरोसिस हा मेंदू आणि पाठीच्या कण्यातील मज्जातंतूंवर परिणाम करणारा आजार आहे, ज्यामुळे स्नायूंच्या हालचाली, संतुलन आणि दृष्टी यांमध्ये समस्या निर्माण होतात. त्यामुळे तिने धावायला सुरूवात केली.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके