शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलेनं ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर खेचली पुरूष सहकाऱ्याची पॅंट, कोर्टानं ठोठावला 'इतक्या' लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:55 IST

Weird News : कधी कधी गंमत अशी अंगावर येते की, तुरूंगातही जावं लागू शकतं किंवा मोठं नुकसानही होऊ शकतं. असंच काहीसं एका महिलेसोबत झालं.  

Weird News : अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, एखाद्याची गंमत करणं काही लोकांना चांगलंच महागात पडतं. कधी कधी गंमत अशी अंगावर येते की, तुरूंगातही जावं लागू शकतं किंवा मोठं नुकसानही होऊ शकतं. असंच काहीसं एका महिलेसोबत झालं. दक्षिण कोरियातील महिलेला पुरूष सहकाऱ्यासोबत प्रॅंक करणं चांगलंच अंगलट आलं.

झालं असं की, महिलेनं सगळ्यांसमोर पुरूष सहकाऱ्याची पॅंट खेचली. यावेळी चुकून त्याची अंडरविअर सुद्धा खेचली गेली होती. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं आणि महिलेला २ हजार डॉलर म्हणजेच १ लाख ७० हजार रूपयांचा दंड भरावा लागला.

साऊथ कोरियाच्या गॅंगवॉन प्रांतातील एका कोर्टानं महिलेला दोषी ठरवत निर्णय दिला. एका रिपोर्टनुसार, चुन्चेओन जिल्हा न्यायालयानं काही दिवसांआधी महिलेला २ हजार डॉलरच्या दंडासोबतच ८ तास विनयभंग रोखण्यासाठीचं शिक्षण घेण्याचा आदेशही दिला.

ही घटना ३ ऑक्टोबर २०२४ मध्ये घडली होती. महिलेनं सगळ्या सहकाऱ्यांसमोर एका पुरूष सहकाऱ्याची पॅंट खेचली होती. ही घटना ते दोघेही काम करत असलेल्या रेस्टॉरन्टमध्ये घडली होती. सहकाऱ्याची पॅंट खेचत असताना चुकून त्याची अंडरविअरही खेचली गेली. त्यामुळे वाद जास्त झाला. महिलेचं वय ५० वर्ष तर पुरूषाचं वय २० वर्षे आहे.

महिलेनं कोर्टात तिनं गंमत केल्याचं म्हटलं होतं. पण कोर्टानं तिचा दावा फेटाळून लावला. तेच तक्रारदारानं आरोप केला की, महिलेच्या गंमतीमुळे त्याचा अपमान झाला. तरूणाची बाजू घेत कोर्टानं महिलेला दंड ठोठावला. तसेच महिलेने तरूण आणि त्याच्या आई-वडिलांची गुडघ्यांवर बसून माफी मागितली होती.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल