शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

महिला अचानक विसरली तिचं आधीचं आयुष्य, पतीला समजते गैर अन् मुलांचीही नाही आठवण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 12:26 IST

महिला जेव्हा हॉस्पिटलमधून घरी केली तेव्हा ती तिचं आधीचं २० वर्षांचं आयुष्य विसरली (Woman Lost Memory Due to Cold) होती.

मनुष्याचं शरीर हे निसर्गाने रचलेल्या सर्वात कठिण गोष्टींपैकी एक आहे. आपल्या शरीरात कधी कोणता आजार होईल आणि त्याचा काय प्रभाव होईल काही सांगता येत नाही. ब्रिटनमधील एका महिलेला सर्दी-पळशाची लक्षणं दिसल्यावर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. महिला जेव्हा हॉस्पिटलमधून घरी केली तेव्हा ती तिचं आधीचं २० वर्षांचं आयुष्य विसरली (Woman Lost Memory Due to Cold) होती.

क्लेअर मफेट (Claire Muffet) नावाच्या महिलेचं वय ४३ वर्षे आहे. तिची तब्येत २०२१ मध्ये बिघडली होती. इन्सफेलायटिसमुळे तिला सर्दी झाली होती आणि ती झोपली. सकाळी पतीने तिला उठवलं तर ती उठू शकली नाही. त्यामुळे तिला अॅम्बुलन्सने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिला याचा जराही अंदाज नव्हता की, हॉस्पिटलमधून परत आल्यावर तिचं आय़ुष्य इतकं बदललेलं असेल.

क्लेअऱ मफेट ब्रूमफिल्डच्या हॉस्पिटलमध्ये भरती होती. तिथे ती बेशुद्ध पडली होती. त्यानंतर तिला काही दिवस लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. पण तिची तब्येत काही ठीक झाली नाही. मफेटला रॉयल लंडन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. न्यूरोलॉजिस्टने सांगितलं की क्लेअर मफेटच्या मेंदूत एन्सेफलायटिसमुळे सूज आली होती. तिला तब्बल १६ रात्रीनंतर जाग आली. पण तोपर्यंत ती तिचं आधीचं सगळं आयुष्य विसरलेली होती. डॉक्टरांनी सांगितलं की, हे मेंदूत ताप गेल्याने झालं. कारण यामुळे तिच्या मेंदूत सूज आली होती.

Daily Star सोबत बोलताना मफेटने सांगितलं की, ती हॉस्पिटलमधून परत आल्यावर पती आणि लग्नाबाबत सगळं विसरलेली होती. तिला तिचे मुलंही आठवत नव्हते. एकूणच ती तिच्या आयुष्यातील साधारण २० वर्षे विसरली होती. सुदैवाने आता हळूहळू तिची स्मरणशक्ती परत येत आहे. तिला हळूहळू काही गोष्टी आठवत आहेत. पण जुन्या गोष्टी आठवण्यात तिला त्रास होतो. आता जुन्या गोष्टी परत आठवण्याची शक्यता कमी झाली आहे. पण ती नव्या आठवणी तयार करत पुढे जात आहे. यात तिची मुलं आणि पती तिला साथ देत आहेत. 

टॅग्स :LondonलंडनJara hatkeजरा हटके