शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ऑफिसमधील महिला पतीला म्हणाली 'बेबी', ऐकताच हायपर झाली पत्नी! भर सोसायटीत हाय व्हॉल्टेज ड्रामा; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:10 IST

दोघांमध्ये आलेल्या तिसऱ्या महिलेवरून हा वाद सुरू झाला. या दोघांमधील वाद इतका वाढला की, पत्नीने पतीला घरातून बाहेर काढले. 

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. नुकताच एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून हसावं की, वाईट वाटून घ्यावं असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. हा व्हिडीओ पती-पत्नीच्या वादाचा असून, जोरदार बाचाबाची होताना दिसत आहे. दोघांमध्ये आलेल्या तिसऱ्या महिलेवरून हा वाद सुरू असल्याचे लक्षात येते. या दोघांमधील वाद इतका वाढला की, पत्नीने पतीला घरातून बाहेर काढले. 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ सिंगापूरमधील असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडीओमध्ये पती पत्नी जोरजोरात वाद घालताना दिसत आहेत. या व्हिडीओमधील पत्नी पतीवर यामुळे चिडली होती की, तिच्या पतीला ऑफिसमधली एक महिला सहकारी 'बेबी' म्हणाली. यावरून पत्नीला भयंकर राग आला. यामुळे चिडलेल्या पत्नीने पतीवर धोका दिल्याचा आरोप देखील केला. मात्र, या सगळ्यादरम्यान पती स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पत्नी काहीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हती.

भर सोसायटीत मोठा ड्रामा!

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की,पत्नी घरच्या बाल्कनीमध्ये उभी आहे, तर पती सोसायटीखाली पार्किंगमध्ये उभा आहे. पत्नी पतीवर आगपाखड करत आहे. तर, पती तिला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा ही महिला ओरडू लागते, तेव्हा पती तिला हळू आवाजात बोल, असे म्हणतो. मात्र, यावर ती आणखीनच संतापते आणि म्हणते की, "तू मला धोका दिला आहे आणि हे सगळ्यांना कळलं पाहिजे."

पत्नीचा संताप अनावर!

यावर उत्तर देताना पती म्हणाला की, "ती महिला ऑफिसमध्ये सगळ्यांनाच बेबी बोलते." यावर पत्नी म्हणाली की, "तुला नक्की खात्री आहे का की, ती सगळ्यांना बेबी म्हणते?" यावर पती काहीही न बोलता तिला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, चिडलेली पत्नी त्याला म्हणते की, "तू मला नाही सांगायचं की मी काय करायला पाहिजे, मी सांगणार तुला तू काय करायचं."

शेवटी पत्नीने पतीसमोर त्याची उशी फेकली आणि त्याला तिथेच रहा असं म्हटलं. "मला तुझं तोंडही बघायचं नाही, तू माझ्या डोळ्यांसामोरून दूर हो", अशी तंबी पत्नीने दिली. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयViral Videoव्हायरल व्हिडिओsingaporeसिंगापूर