शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

एलियनमुळे प्रेग्नेंट झाल्याचा महिलेचा दावा, अमेरिकच्या संरक्षण मंत्रालयाने केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 14:26 IST

एका महिलेनं आता अतिशय अजब दावा केला आहे. एका एलियनला भेटल्यानंतर ती गरोदर राहिल्याचं महिलेचं म्हणणं आहे.

'एलियन्स' (Aliens) एक रहस्य आहे ज्यामध्ये जवळजवळ प्रत्येक माणसाला रस आहे आणि शास्त्रज्ञ सतत त्यांचा शोध घेत आहेत. परंतु सर्व दावे आणि अनेक कथित व्हिडिओंनंतरही पुराव्यांअभावी एलियन्स हे आजही एक गूढच आहेत. आजवर 'दुसऱ्या ग्रहावरील प्राणी' आणि UFO बद्दल अनेक आश्चर्यकारक दावे करण्यात आले आहेत. परंतु एका महिलेनं आता अतिशय अजब दावा केला आहे. एका एलियनला भेटल्यानंतर ती गरोदर राहिल्याचं महिलेचं म्हणणं आहे (Woman got Pregnant after Sexual Encounter with Alien)

'Anomalous Acute And Subacute Field Effects on Human and Biological Tissues' नावाच्या शीर्षकाच्या अहवालात यूएस संरक्षण मंत्रालयाने 'अलौकिक अनुभव' असल्याचा दावा करणाऱ्या लोकांच्या आरोग्याची तपासणी केली. यातील काही प्रकरणं अतिशय साधी, काही अतिशय विचित्र तर एक केस 'गूढ गर्भधारणा'ची होती. अहवालात एलियन किंवा यूएफओ जवळ आल्यावर दिसणाऱ्या प्रभावांची सूची समाविष्ट आहे.

यामध्ये दुखापतीपासून ते अपहरण आणि 'सेक्स' तसंच 'मृत्यू'चीही पाच प्रकरणे आहेत. यादीत सहभागी इतर अनुभवांमध्ये वाईट स्वप्न, आवाज अचानक बंद होणं, डोळ्यांना दुखापत, श्वास घेण्यास त्रास आणि वजन कमी होणे यांचा समावेश आहे. डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी (DIA) कडून मिळालेल्या दस्तऐवजाचा हवाला देत द सनने हे निकाल प्रकाशित केले आहेत. अहवालानुसार, यामध्ये सरकारद्वारे तयार करण्यात आलेले वैज्ञानिक अहवाल आणि UFO प्रोग्रामशी संबंधित पेंटागॉनच्या पत्रांचा समावेश आहे.

अहवालानुसार, 'बाहेरील विमानांशी संपर्क झाल्यामुळे' अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी ४२ प्रकरणे मेडिकल फाईलची आहेत आणि ३०० प्रकरणे 'अप्रकाशित' आहेत, ज्यात माणसं जखमी झाली आहेत. निकालाशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक झाल्यानंतर सोशल मीडियावर काहींनी त्याची खिल्ली उडवली. ट्विटरवर एका युजरने लिहिलं की, 'माझ्या मोठ्या पोटाचा अर्थ असा नाही की मी लठ्ठ आहे, तर मी रहस्यमयपणे गर्भवती आहे.'

टॅग्स :Jara hatkeजरा हटके