३ वर्षांपूर्वी गायब झाला होता पती, पत्नीने TikTok व्हिडीओ पाहिला आणि....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 04:02 PM2019-07-03T16:02:28+5:302019-07-03T16:04:08+5:30

फेसबुकच्या माध्यमातून अनेक दूर गेलेले मित्र भेटल्याची घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. पण यावेळी ही कमाल TikTok ने अ‍ॅपने केली आहे.

Woman found missing husband on Tiktok video after three years | ३ वर्षांपूर्वी गायब झाला होता पती, पत्नीने TikTok व्हिडीओ पाहिला आणि....

३ वर्षांपूर्वी गायब झाला होता पती, पत्नीने TikTok व्हिडीओ पाहिला आणि....

Next

फेसबुकच्या माध्यमातून अनेक दूर गेलेले मित्र भेटल्याची घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. पण यावेळी ही कमाल TikTok ने अ‍ॅपने केली आहे. हे अ‍ॅप काही महिन्यांपूर्वी बॅन करण्यात आलं होतं. या अ‍ॅपमुळे तीन वर्षांपूर्वी गायब झालेला एका महिलेचा पती सापडला आहे. ही घटना आहे तामिळनाडूच्या विल्लुपुरम येथील. जयाप्रदा नावाच्या महिलेचा पती ३ वर्षापूर्वी त्यांना सोडून अचानक गायब झाला होता. पण टिकटॉकने त्याला शोधण्यास मदत झाली.

न्यू इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट्सनुसार, सुरेश नावाची व्यक्ती ती वर्षापूर्वी २०१६ मध्ये आपल्या दोन मुलांना आणि पत्नी जयाप्रदाला सोडून गेला होता. पत्नीने त्याच्या गायब होण्याची तक्रार पोलिसातही दिली होती. पोलिसांनी त्याचा शोधही घेतला, पण सुरेश काही मिळाला नव्हता.

काही दिवसांपूर्वी जयाप्रदाला तिच्या नातेवाईकांनी एक व्हिडीओ दाखवला. या टिकटॉक व्हिडीओमध्ये एक व्यक्ती होती. जी सुरेशसारखी दिसत होती. खात्री करून घेण्यासाठी नातेवाईकांनी जयाप्रदाला व्हिडीओ दाखवला आणि तो व्हिडीओ बघून ती आनंदी झाली. कारण व्हिडीओतील व्यक्ती सुरेशच होता.

जयाप्रदा नातेवाईकांना घेऊन लगेच पोलिसांकडे गेली. पोलिसांना सुरेशच्या व्हिडीओला होसुरमध्ये ट्रेस केलं आणि त्याचा शोध लावला. रिपोर्ट्सनुसार, सुरेश होसुरमध्ये एका ट्रॅक्चर कंपनीत काम करत होता. इतकेच नाही तर येथील एका किन्नरासोबत त्याचे संबंधही होते.

ज्या व्हिडीओमुळे सुरेशची माहिती मिळाली त्यात किन्नरही होते. त्यामुळे पोलिसांना ट्रान्सजेंडर असोसिएशनच्या मदतीने सुरेशचा पत्ता शोधला. असे सांगितले जात आहे की, पोलिसांना सुरेशला समजावून पत्नीसोबत घरी पाठवले आहे. आतापर्यंत टिकटॉकमुळे नुकसान झाल्याच्याच बातम्या समोर येत होत्या. ही पहिलीच अशी बातमी असेल ज्यात टिकटॉकमुळे कुणाला मदत झाली.

Web Title: Woman found missing husband on Tiktok video after three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.