शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

महिलेला सापडली १०० वर्ष जुनी पत्रं, त्यात लिहिलं होतं कुटुंबाबत धक्कादायक सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 14:57 IST

या पत्रांमध्ये त्या कुटुंबाबद्दलचं असं एक गुपित आहे ज्यामुळे त्या कुटुंबाला धक्का बसू शकतो (Woman found love affair letters of a family). आता ही पत्रं त्या कुटुंबाकडे सोपवावी का याबद्दल ही महिला संभ्रमात आहे. त्यामुळे ती सोशल मीडियावर याबद्दल लोकांकडून त्यांची मतं जाणून घेत आहे.

प्रत्येक कुटुंबाच्या काही परंपरा असतात, प्रथा असतात तसंच काही गुपितंही असतात. तुम्हाला एखाद्या कुटुंबाबद्दलचं असं गुपित कळलं ज्यामुळे त्या कुटुंबात भावनिक भूकंप होऊ शकतो, तर तुम्ही काय कराल? त्या कुटुंबाला ते सांगाल की गप्प बसाल? अर्थातच यावर प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतील. अमेरिकेतील एका महिलेला एका कुटुंबाबद्दलची एक जवळपास १०० वर्ष जुनी पत्रं मिळाली आहे (American woman found 100 year old secret letters). या पत्रांमध्ये त्या कुटुंबाबद्दलचं असं एक गुपित आहे ज्यामुळे त्या कुटुंबाला धक्का बसू शकतो (Woman found love affair letters of a family). आता ही पत्रं त्या कुटुंबाकडे सोपवावी का याबद्दल ही महिला संभ्रमात आहे. त्यामुळे ती सोशल मीडियावर याबद्दल लोकांकडून त्यांची मतं जाणून घेत आहे.

अमेरिकेतील २८ वर्षांची चेल्सी ब्राऊन (Chelsey Brown) ही व्यवसायानं जिनिऑलॉजिस्ट (genealogist) आहे. जिनिऑलॉजीमध्ये कौटुंबिक इतिहासाचा (Woman research about history of other families) अभ्यास केला जातो. इतरांच्या कुटुंबाबद्दल माहिती घेऊन, वाचून, त्यांच्या पूर्वजांबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. चेल्सी विविध माध्यमांतून म्हणजे जुन्या चिठ्ठ्या, डायरी किंवा अन्य वस्तूंच्या माध्यमातून हा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्या वस्तू किंवा चिठ्ठ्या संबंधित कुटुंबापर्यंत पोहोचवते.

अशाच एका अभ्यासादरम्यान चेल्सीला एका कुटुंबाच्या संदर्भातील काही पत्रं सापडली. ही पत्रं १९०१ ते १९११ या काळातील आहे. म्हणजेच ही पत्रं जवळपास १०० वर्ष जुनी आहे. त्यात या कुटुंबाबद्दलचं एक गुपित तिला आढळलं आहे. तिनं या काळातील बऱ्याच जुन्या चिठ्ठ्या वाचल्या आणि तिला धक्का बसला. या पत्रांमध्ये एका अफेअर म्हणजेच प्रेमप्रकरणाचा उल्लेख आहे. या कुटुंबातील एका महिलेचं तिच्या भावी नवऱ्याच्या मित्राबरोबरच प्रेमप्रकरण सुरू झालं होतं. विशेष म्हणजे लग्न झाल्यानंतरही हे प्रेमप्रकरण सुरूच होतं. याचबद्दल चेल्सीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लिहीलं आहे.

अर्थात चेल्सीनं सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ही पत्रं कोणत्या कुटुंबाची आहे त्याचा उल्लेख केलेला नाही. पण ही चिठ्ठी त्या कुटुंबाकडे सोपवायची की नाही याबद्दल आपल्याला प्रश्न पडला असल्याचं तिनं म्हटलं आहे. या चिठ्ठीतील गुपितं वाचून त्या कुटुंबाला धक्का तर बसेलच; पण वाईटही वाटू शकतं असं चेल्सीचं म्हणणं आहे. या व्हिडीओवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एकानं म्हटलं आहे की, ही गोष्ट आता खूप जुनी झाली आहे. ज्या लोकांमध्ये हे अफेअर सुरु होतं ते आता या जगात असतील की नाही हीदेखील शंका आहे. अशा परिस्थितीत त्या कुटुंबाला त्यांच्याबद्दल काही सांगून दु:ख देऊ नये. तर आपल्या कुटुंबाबद्दलचा गुपितं आणि अन्य सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रत्येकाला हक्क असतो. त्यामुळे ही पत्रं त्यांच्यापर्यंत सोपवली गेली पाहिजे, असा सल्ला एका व्यक्तीनं दिला आहे. ज्या गोष्टींमुळे कुटुंबांमध्ये मतभेद होतील, भांडणे होतील किंवा काहीतरी वाईट घडेल अशा गोष्टी सहसा आपण त्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवत नाही असं चेल्सीचं म्हणणं आहे. त्यामुळे अर्थातच ही पत्रं त्या कुटुंबीयांकडे चेल्सी सोपवणार का हा पूर्णपणे तिचा वैयक्तिक निर्णय असेल, असंही चेल्सीनं स्पष्ट केलं आहे. मात्र आपल्या कुटुंबामध्ये कोणती गुपितं असतील अशा उत्सुकता तुम्हालाही नक्कीच लागली असेल.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके