शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

चॉकलेट्स खावीत इतक्या सहज खाते सीमेंट-प्लॅस्टरचे गोळे, कोण आहे ही महिला? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 15:30 IST

Woman eats Cement Bricks: एका रिपोर्टनुसार, ती घराच्या भिंतीकडे टक लावून पाहत राहते आणि भिंतींच्या आतील गोष्टी खाण्यासाठी काही वेळा चक्क प्लॅस्टर तोडते.

Woman eats Cement Bricks: हल्लीचं जग विविधतांनी नटलेलं आहे. संपूर्ण जगभरात कोण कधी काय करेल याचा काहीच अंदाज लावता येणं शक्य नसते.  एखादी गोष्ट वारंवार केल्यावर त्याची सवय करून घेणे हा मानवाचा स्वभाव आहे. जगभरातील लोक वेगवेगळ्या सवयी बनवतात. त्या कधीकधी व्यसनात बदलतात. कधी हे व्यसन काही आरोग्यदायी खाण्याचे असते, तर कधी शरीराला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टींचे असते. पण माती आणि सिमेंट खाण्याचे व्यसन लागल्याचे तुम्ही ऐकले आहेत का... ही गोष्ट तशी फार कठीण आहे पण असा प्रकार इंग्लंडमधील एका ३९ वर्षीय महिलेसोबत घडला आहे. एखाद्या लहान मुलाने चॉकलेट किंवा बिस्कीटं खावी, इतक्या सहजतेने ती महिला सिमेंट-माती आणि प्लॅस्टरचे गोळे खाते. तिच्या या सवयीने पतीलाही आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

कोण आहे ही महिला?

३९ वर्षीय या महिलेचे नाव आहे, पेट्रिस बेंजामिन रामगुलाम. (patrice benjamin-ramgoolam) या महिलेला वाळू, वीट आणि सिमेंट खाण्याचे व्यसन लागले आहे. विशेष म्हणजे, या सर्व गोष्ट खाताना तिला खूप टेस्टी लागतात, असेही ती सांगते. वयाच्या १८ व्या वर्षी कानात वाळू, सिमेंट आणि विटांचे तुकडे टाकण्याची तिला सवय त्याला लागली होती. काहींना गोड पदार्थ आवडतात, तर काहींना मसालेदार पदार्थ आवडतात. पण पेट्रीसला मात्र वाळू, वीट आणि मोर्टारची चव आवडते. एका रिपोर्टनुसार, ती घराच्या भिंतीकडे टक लावून पाहत राहते आणि भिंतींच्या आतील गोष्टी खाण्यासाठी काही वेळा चक्क प्लॅस्टर तोडते.

पतीची प्रतिक्रिया काय?

जेव्हा पेट्रीसच्या पतीला या व्यसनाबद्दल कळले तेव्हा त्याने पेट्रिसला ही सवय सोडण्याची विनंती केली. मात्र, पेट्रीस ही सवय सोडू शकलेली नाही. तिच्या मते वीट, सिमेंट आणि प्लॅस्टरचे तुकडे खाल्ल्याने तिला आनंदी राहण्यास मदत होते. हे व्यसन इतके तीव्र आहे की ती तिची प्रकृती हळूहळू बिघडवत आहे हे माहीत असूनही ती या गोष्टी सोडू शकत नाही, असेही अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके