शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

काय सांगता! पैसे वसुल करायचे म्हणून हिनं खा-खा खाल्लं, अन् नंतर थेट पोहोचली हॉस्पिटलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 16:56 IST

या महिलेने आपण जितके पैसे दिले तितके पैसे वसूल करण्याच्या नादात इतकं खाल्लं की तिची अवस्था भयंकर झाली.

 लोकांना एखादी विकत घेतलेली वस्तू किंवा कोणतीही गोष्ट पैसे वसूल होईपर्यंत वापरण्याची सवय असते. एका महिलेने आपला हा नियम अगदी खाण्याच्या बाबतीतही लागू केला (Woman eat lost of food at buffet restaurant). एका बुफे रेस्टॉरंटमध्ये ती गेली. जिथं सुरुवातीला एकदाच पैसे द्यायचे असतात आणि हवं तितकं मनसोक्त पोट भरून खायला मिळतं. या महिलेने आपण जितके पैसे दिले तितके पैसे वसूल करण्याच्या नादात इतकं खाल्लं की तिची अवस्था भयंकर झाली.

अमेरिकेतील २४ वर्षांची डॅनियल शाप्रियो (Danielle Shapiro) कॅलिफोर्नियातील माऊंटन व्ह्यू रेस्टॉरंट सुशी 85 मध्ये ती गेली (Woman eat 32 sushi). तिथं बुफेसाठी एका व्यक्तीला ५० डॉलर्स म्हणजे जवळपास ३ हजार ७०० रुपये होते. डॅनिअलने पैसे दिले आणि तिने ती वसूल करण्याचीही तयारी केली. पाहतात पाहता तिने ३२ सुशी रोल, ४ डम्पलिंग, २ वाटी सोयाबीन, २ जॅलेपिनो पॉपर्स आणि एक वाटी मिसो सूप प्यायली. ही यादी वाचूनच आपल्याला चक्कर आली विचार करा डॅनिअलची काय अवस्था झाली असेल. डॅनिअलच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. तिची अवस्था खूपच भय़ंकर झाली. अखेर तिला रुग्णालयातच दाखल करावं लागलं. डॉक्टरांनी तिला गॅस आणि अ‍ॅसिडीटी झाल्याचं सांगितलं.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार ही घटना २१ डिसेंबर, २०२१ ची आहे. डॅनिअलने स्वतः आपला हा अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे. तिने टिकटॉवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिने सांगितलं, तिची बेस्ट फ्रेंड अमांडासोबत ती सुशी खायला गेली होती. दोघींनी ३ हजार ७०० रुपये वसूल करण्याच्या नादात तब्बल २ तास खाल्लं.

आता खाल्ल्यानंतर इतका त्रास झाला तरी डॅनिअलचं सुशी प्रेम काही कमी झालं नाही. आपण आपला आवडता पदार्थ खातच राहणार असं तिने सांगितलं. पण आपण हे कमी प्रमाणात खाऊ असंही ती म्हणाली.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके