शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! फक्त ४ मिनिटात दिला बाळाला जन्म, इतक्या कमी वेळात बाप झाल्याने पती शॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 17:32 IST

एका महिलेने मात्र प्रसूती वेदनांशिवाय फक्त ४ मिनिटांतच बाळाला जन्म दिला आहे (Woman Deliver Child In 4 Minutes). यामुळे आईबाबा बनलेलं हे कपलही शॉक झालं.

आईबाबा होणं हा प्रत्येक कपलच्या आयुष्यातील एक अनमोल, अविस्मरणीय असा क्षण असतो. पण हा प्रवासही तितकाच मोठा आणि गुंतागुंतीचाही असतो. बाळाला ९ महिने पोटात वाढवल्यानंतर महिलेला डिलीव्हरीवेळी किती तरी वेळ असह्य अशा प्रसूती वेदनांचाही सामना करावा लागतो. पण एका महिलेने मात्र प्रसूती वेदनांशिवाय फक्त ४ मिनिटांतच बाळाला जन्म दिला आहे (Woman Deliver Child In 4 Minutes). यामुळे आईबाबा बनलेलं हे कपलही शॉक झालं.

किम असं या महिलेचं नाव आहे. तिने आपल्या प्रेग्नन्सीचा आणि डिलीव्हरीचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपण फक्त चार मिनिटांत आपल्या बाळाला जन्म दिल्याचा दावा या महिलेने केला आहे. आपल्या टिकटॉक अकाऊंटर किमने सांगितलं, सकाळी तिचा नवरा ऑफिसला गेला. त्यानंतर ती सकाळी १० वाजता  ती आपल्या रूटिन चेकअपसाठी गेली.  तिथून परतली ती बाळाला घेऊनच. डॉक्टरांनी तिला लगेचच भरती करून घेतलं. पण तिच्या डिलीव्हरीची तयारी होण्याआधीच तिला बाळ झालं.

तिथं तिचा बीपी तपासण्यात आला. त्यानंतर पोटातील बाळाचे हार्टबीट्सही तपासण्यात आले. तिचं शरीर डिलीव्हरीसाठी किती तयार झालं आहे हे डॉक्टर तपासत होते. तेव्हा डॉक्टरांना दिसलं की किम आता कधीही बाळाला जन्म देऊ शकते. तेव्हा तिची प्रसूतीची तारीख आली नव्हती. डॉक्टरांनी तिला लेबर पेन होतं का हे विचारलं. पण किमला तसं काहीच वाटत नव्हतं. तरी डॉक्टरांनी डिलीव्हरीची तयारी केली. पण त्याआधीच अवघ्या ४ मिनिटांत तिने आपल्या बाळाला जन्म दिला.

आपण इतक्या लगेच आई होऊ याचा तिलाही अंदाज नव्हता. डिलीव्हरीच्या दोन मिनिटं आधी तिने आपल्या नवऱ्याला फोन करून डॉक्टर आपली डिलीव्हरी करणार आहेत, असं सांगितलं. पण इतकं लवकर सर्व होईल याचा विचारही त्यांनी केला नव्हता.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके