शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एक-दोन नव्हे तब्बल १३ बाळं आहेत या महिलेच्या गर्भात, विचित्र प्रेग्नसी पाहुन डॉक्टरही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 22:21 IST

या महिलेच्या पोटात 13 बाळ असल्याचा दावा केला जातो आहे. मेक्सिकोतील या महिलेच्या प्रेग्नन्सीची चर्चा सर्वत्र होते आहे. तिच्या प्रेग्नन्सीमुळे प्रशासनही चिंतेत आलं आहे.

एखादी महिला फार फार तर एकाच वेळी किती मुलांना जन्म देईल. 2, 3, 4. पण तुम्हाला वाचूनच धक्का बसेल एक महिला एकाच वेळी तब्बल 13 मुलांना जन्म देणार आहे. या महिलेच्या पोटात 13 बाळ असल्याचा दावा केला जातो आहे. मेक्सिकोतील या महिलेच्या प्रेग्नन्सीची चर्चा सर्वत्र होते आहे. तिच्या प्रेग्नन्सीमुळे प्रशासनही चिंतेत आलं आहे (Woman pregnant with 13 babies).

मेक्सिकोच्या  इक्सटापलुकात राहणारी मारित्जा हर्नांडेज मेंडेज, जी आधीच सहा मुलांची आई आहे.  2017 साली तिने पहिल्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर 2020 साली तिला जुळी झाली आणि 2021 साली तिळ्यांना जन्म दिला आहे. आता लवकरच ती एकाच वेळी 13 मुलांना जन्म देणार आहे.

तज्ज्ञांच्या मते, एकाच वेळी इतक्या मुलांचा जन्म होणं हे दुर्मिळ आहे. तसंच एकाच वेळी इतक्या मुलांची डिलीव्हरी हे धोकादायक आहे. पण ही तेराही मुलं ठिक आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिल्याचं स्थानिक काऊन्सलर गेरार्डाे ग्युरेरो  यांनी सांगितलं.  मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, ग्युरेरो यांनी नागरिकांना या कुटुंबाला मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

ते म्हणाले, मारित्जाचा नवरा अँटोनिया 14 वर्षांपासून अग्निशमन जवान म्हणून काम करत आहे. त्यांना जितका पगार मिळतो. त्यात ते 19 मुलांचं पालनपोषण करू शकत नाही. अशी बरीच कामं आहेत, ज्यात इतक्या मुलांना सांभाळता येईल इतका पगार मिळत नाही.  लोकांनी अँटोनिया यांची ओळख करून घ्यावी आणि एकत्र मिळून त्यांना मदत करावी, असं मी आवाहन करतो. जेणेकरून ते आपल्या कुटुंबाचा खर्च पेलू शकतील.

गेरार्डो यांनी महापौर फेलिप अरविजू यांना या प्रकरणात लक्ष द्यायला सांगितलं आहे. या कुटुंबाला आर्थिक समस्यांचा सामना पडणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी विनंती त्यांनी त्यांना केली आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके