शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

डोकं फिरलंया... पहिल्या डेटनंतर तिनं त्याला पाठवले ६५,००० मेसेज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 14:30 IST

मेसेजमधून धमक्या दिल्यानं महिलेची तुरुंगात रवानगी

अॅरिझोना: डेट करण्यासाठी पुरुष पुढाकार घेतात, असं तुम्ही ऐकलं असेल. पहिल्या डेटनंतर नातं पुढे नेण्यातही पुरुष जास्त उत्सुक असतात, असंही म्हटलं जातं. त्यासाठी मग फोनवरुन संपर्क साधून संवाद सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र अॅरिझोनामध्ये याच्या अगदी उलट घडलंय. अॅरिझोनात राहणाऱ्या एका 31 वर्षीय महिलेनं पहिल्या डेटनंतर तब्बल 65 हजार मेसेज पाठवले. जॅकलिन अॅडेस असं या महिलेचं नाव आहे. 65 हजार मेसेजपैकी बहुतांश मेसेजमधून तिनं समोरच्या व्यक्तीला धमकी दिली होती. त्यामुळे जॅकलिनची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. जॅकलिन गेल्या उन्हाळ्यात एका पुरुषाला भेटली होती. या पुरुषासोबतचं नातं पुढे नेण्याची तिची इच्छा होती. त्यासाठी ती त्याला वारंवार मेसेज करु लागली. समोरुन फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं पाहून जॅकलिननं थेट धमक्या द्यायला सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे, ही महिला पुरुषाला भेटण्यासाठी थेट त्याच्या घरी पोहोचली. त्यावेळी तिच्या हातात चाकू होता. या घटनेचं सीसीटीव्ही पाहून संबंधित पुरुषानं या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. यानंतर जॅकलिनला अटक करण्यात आली. 'मला कधीही सोडून जाऊ नकोस. अन्यथा मी तुझा खून करेन,' 'मला तुझ्या रक्तानं आंघोळ करायची आहे,' असे धमकीपूर्ण मेसेज केल्यानं जॅकलिनला पोलिसांनी अटक केली.धमकी देणं, मानसिक छळ करणं, अशा आरोपांखाली जॅकलिन सध्या तुरुंगात आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या प्रतिनिधीनं जॅकलिनशी तुरुंगात संवाद साधला. 'त्याला भेटल्यावर आयुष्याचा जोडीदार भेटला, असं मला वाटलं होतं. इतरांसारखंच आम्हीदेखील आयुष्यभर सोबत राहू, अशी इच्छा माझ्या मनात होती. आमचं लग्न होईल आणि पुढे सर्व छान होईल, असं स्वप्न मी पाहिलं होतं,' असं जॅकलिननं सांगितलं. मी त्याला माझं सर्वस्व मानलं होतं, असंही ती म्हणाली.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके