शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने वाचले पतीचे डिलीट केलेले मेसेज, झाला दोघांचा घटस्फोट; आता व्यक्तीने कंपनीवर ठोकला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 11:10 IST

मेसेज वाचल्यावर त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली. आता या व्यक्तीने अ‍ॅप्पल कंपनीवर कोट्यावधी रूपयांची केस केली आहे.

मोबाईल फोनमुळे एकीकडे काही कामे सोपी झाली आहेत. तर काही लोकांना मोबाईलच्या वेगवेगळ्या टेक्निकमुळे मोठं नुकसानही होतं. एका व्यक्तीच्या पत्नीने त्याचे फोनमधील मेसेज वाचले. त्याला वाटलं होतं त्याने हे मेसेज डिलीट केले. हे मेसेज वाचल्यावर त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली. आता या व्यक्तीने अ‍ॅप्पल कंपनीवर कोट्यावधी रूपयांची केस केली आहे. पत्नीने पतीचे सेक्स वर्कर्सना पाठवलेले मेसेज वाचले होते.

व्यक्तीने हे मेसेज आयफोनमधून डिलीट केले होते. पण त्याचा आयफोन परिवाराच्या आयमॅकसोबत जोडलेला होता आणि मेसेज त्याच्याकडून डिलीट झाले नसल्याने घटस्फोटाची वेळ आली. आता इंग्लंच्या या उद्योगपतीने अ‍ॅप्पल कंपनीला कोर्टात खेचलं आहे.  द टाइम्सच्या रिपोर्टनुसार, या व्यक्तीला आपली ओळख जगासमोर आणायची नाही. सेक्स वर्कर्ससोबत बोलण्यासाठी ही व्यक्ती आयमेसेजचा वापर करत होती.

उद्योगपतीचा दावा आहे की, त्याने त्याच्या आयफोनमधून मेसेज डिलीट केले होते. पण परिवाराचे डिवायसेसे एकाच अ‍ॅप्पल आयडीसोबत जुळलेले असल्याने आयमॅकवर अजूनही मेसेज वाचले जाऊ शकत होते. तो म्हणाला की, कंपनीने हे नाही सांगितलं की, एका डिवाइसवरून मेसेज डिलीट केल्यावर ते सगळ्या लिंक केलेल्या डिवाइसवरूनही डिलीट होत नाहीत. 

द टाइम्सने सांगितलं की, व्यक्तीच्या पत्नीने हे मेसेज वाचले आणि तिने घटस्फोटाची नोटीस पाठवली. त्याला पत्नीला साधारण ५२ कोटी ९२ लाख रूपये द्यावे लागले. जर मेसेज तिने वाचले नसते तर घटस्फोट झाला नसता.

तो म्हणाला की, अ‍ॅप्पल कंपनीकडून मेसेज डिलीट करण्याबाबत स्पष्टता नसल्याने असं झालं. अ‍ॅप्पलने मला सांगितलं की, माझे मेसेज डिलीट केले आहेत. पण मुळात तसं काही झालंच नाही. जर मेसेजमध्ये असं लिहिलं असतं की, हे मेसेज केवळ याच डिवाइसवरून डिलीट झाले आहेत आणि दुसऱ्या लिंक असलेल्या डिवाइसवर दिसतील. तरीही असं झालं नसतं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेEnglandइंग्लंड