शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

विमानातून नारळ सोबत नेण्यावर का आहे बंदी? तुम्हालाही माहीत नसेल कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 17:09 IST

Why Is Coconut Not Allowed In Plane: धारदार हत्यार, पिस्तुल आणि ज्वलनशील पदार्थासहीत अनेक गोष्टी विमानात सोबत नेण्यावर बंदी आहे. त्याशिवाय एक असं फळंही आहे जे विमानात सोबत नेता येत नाही.

Why Is Coconut Not Allowed In Plane: बस आणि रेल्वेच्या तुलनेत विमानात प्रवास करताना कितीतरी नियमांचं पालन करावं लागतं. प्रत्येक एअरलाईन्सकडून सोबत काय न्यावं आणि नेऊ नये यासाठी काही नियम तयार केले आहेत. जे प्रत्येक प्रवाशाला काटेकोरपणे पाळावे लागतात. जर हे नियम फॉलो केले गेले नाही तर प्रवाशावर कायदेशीर कारवाई देखील केली जाते किंवा तुरूंगातही जावं लागू शकते. धारदार हत्यार, पिस्तुल आणि ज्वलनशील पदार्थासहीत अनेक गोष्टी विमानात सोबत नेण्यावर बंदी आहे. त्याशिवाय एक असं फळंही आहे जे विमानात सोबत नेता येत नाही. 

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एक असं फळ आहे जे विमानात सोबत नेण्यावर बंदी आहे. ते फळ म्हणजे नारळ. विमानात प्रवास करत असताना तुम्ही सोबत नारळ नेऊ शकत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे वाळलेल्या नारळात तेलाचं प्रमाण अधिक असतं. आणि तेलाला ज्वलनशील पदार्थांच्या श्रेणीत ठेवलं जातं. त्यामुळे सुरक्षेच्या कारणानं विमानात सोबत नारळ नेण्यास परवानगी नाही.

गेल्यावर्षी एअरपोर्टच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. हे नियम खासकरून दुबईला जाणाऱ्या प्रवाशांना पाळाले लागतात. आतापर्यंत प्रवाशी त्यांच्या आवश्यक गोष्टी जसे की, औषधं आपल्या सोबत असलेल्या बॅगमध्ये नेत होते. पण आता नव्या नियमांनुसार, आता काही औषधांवर दुबईला जाणाऱ्या उड्डाणांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. प्रवाशांना या नियमांबाबत माहीत असलं पाहिजे. 

दुबईचा प्रवास करत असताना हे जाणून घेणं गरजेचं ठरतं की, कोणत्या गोष्टी हॅंड बॅगमध्ये आणि चेक इन बॅग्समध्ये ठेवाव्या. अनेक नकळत लोक सोबत अशा गोष्टी आणतात, ज्या विमानात घेऊन जाण्यास बेकायदेशीर मानल्या जातात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सairplaneविमान