शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या रंगाचेच का असतात गाड्यांचे टायर? जाणून घ्या यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 10:15 IST

Why Tyres Color Black : तुम्ही विचार केलाय का की, कोणत्याही गाडीच्या टायरचा रंग काळाच का असतो? देशातच नाही तर परदेशातही गाड्यांच्या टायरचा रंग काळा असतो. 

Why Tyres Color Black : रस्त्यावर चालणारी वाहने सध्या मनुष्यांच्या जीवनातील महत्वाचा भाग झाले आहेत. आपल्या रोजच्या कामांसाठी लोक वाहनांचा वापर करतात. जेव्हाही तुम्ही शोरूममध्ये एखादी गाडी खरेदी करण्यासाठी जाता तेव्हा वेगवेगळ्या रंगाच्या गाड्या तुम्हाला बघायला मिळतात. पण टू-व्हिलर असो वा फोर-व्हिलर यात एक कॉमन गोष्ट असते. ती म्हणजे गाडीचे टायर. तुम्ही विचार केलाय का की, कोणत्याही गाडीच्या टायरचा रंग काळाच का असतो? देशातच नाही तर परदेशातही गाड्यांच्या टायरचा रंग काळा असतो. 

टायरचा रंग काळाच का असतो?

तुम्हाला माहीत नसेल पण टायरचा रंग काळा असण्यामागे फार मोठं सायन्स आहे. त्याशिवाय सगळ्याच कंपन्या काळ्या टायरला चांगला मानतात. एका रिपोर्टनुसार, कच्चा रबर म्हणजे रॉ रबर पिवळ्या रंगाचा असतो. पण या रबराने टायर बनवला तर तो लवकर घासला जातो. त्यामुळे टायरसाठी वापरण्यात येणाऱ्या रबरमध्ये कार्बन मिक्स केलं जातं. जेणेकरून ते जास्त काळ टिकावं. हेच मजबूतीसाठी मिक्स केलं जाणारं कार्बनच टायरला काळं करतं. कार्बनसोबतच यात सल्फरही मिक्स केलं जातं. ज्यामुळे टायर मजबूत होतात.

दुसऱ्या रंगाचे का नसतात टायर?

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, कधीकाळी गाड्यांच्या टायरचा रंग पांढरा राहत होता. आजच्या काळ्या रंगाच्या टायरच्या तुलनेत पांढरे किंवा दुधिया रंगाचे टायर कमी मजबूत असायचे. तुम्ही लहान मुलांच्या सायकले टायर पाहिले असतील. ते वेगवेगळ्या रंगाचे असतात. हे टायर काही महिन्यात घासून खराब होतात. कारण यात कार्बनचा वापर केलेला नसतो. 

एका रिपोर्टनुसार, एखाद्या साध्या रबराचा टायर जिथे 8 हजार किलोमीटर चालू शकतो, तिथे कार्बनयुक्त रबराचा टायर 1 लाख किलोमीटर चालू शकतो.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके