Trees Painted White: तुम्ही अनेक रस्त्यानं प्रवास करत असताना बघितलं असेल की, रस्त्याच्या कडेला लावलेल्या झाडांच्या खोडांना पांढरा रंग लावलेला असतो. हा प्रकार केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही केला जातो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, झाडांच्या खोडांना पांढरा रंग का दिला जातो? याचा उद्देश काय असतो? याचं काही वैज्ञानिक कारण आहे का? जर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर चला जाणून घेऊ यामागचं कारण...
कीटकांपासून बचाव
झाडांची खोडं पांढऱ्या रंगानं किंवा चुन्यानं रंगवण्याचं मुख्य कारण झाडांचा कीटकांपासून बचाव करणं हे आहे. झाडाचं खोड रंगवण्यासाठी चुना आणि पाण्याचा वापर केला जातो. हे मिश्रण एक नॅचरल कीटकनाशकासारखं काम करतं. यामुळे कीटक झाडावर चढण्यापासून रोखले जातात आणि झाडांचं नुकसान टाळलं जातं.
तापमान नियंत्रण
पांढरा रंग सूर्यकिरणांना रिफ्लेक्ट करतो, ज्यामुळे झाडांच्या खोडांचं तापमान नियंत्रित राहतं. उन्हाळ्यात जेव्हा जास्त उन्ह अससतं, तेव्हा झाडांची खोडं जास्त गरम होतात. ज्यामुळे झाडांचं नुकसान होतं. पांढरा रंग झाडांच्या खोडांना थंड ठेवतो आणि त्यांचा गरमीपासून बचाव करतो.
रात्री रस्ता दिसणे
रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या खोडांना पांढरा रंग लावण्याचं आणखी महत्वाचं कारण म्हणजे व्हिजीबिलीटी वाढवणं. पांढरा रंग रात्री सहजपणे दिसतो, ज्यामुळे ड्रायव्हर रस्त्याच्या किनारी असलेल्या झाडांची स्थिती माहीत पडते. हे अपघात टाळण्यासाठी महत्वाचं ठरतं.
स्वच्छता आणि सुंदरतेचं प्रतीक
पांढरा रंग स्वच्छता आणि सुंदरतेचं प्रतीन मानला जातो. रस्त्याच्या किनारी लावण्यात आलेल्या झाडाच्या खोडांना पांढरा रंग दिल्यानं वातावरण स्वच्छ आणि सुंदर दिसतं. हा गावं आणि शहरातील रस्ते सजवण्याची एक पद्धत आहे.
झाडांचं वय वाढवणं
पांढऱ्या रंगानं झाडांच्या खोडांना रंगवल्यानं त्यांचं वय वाढवण्यासही मदत मिळते. यामुळे झाडांचा अनेक इन्फेक्शन, फंगस आणि कीटकांपासून बचाव होतो. ज्यामुळे झाडं आणखी जास्त काळ निरोगी आणि हिरवीगार राहतात.