व्हेल माशाच्या मोठ्या डोक्यात एक चिकट पदार्थ मिळतो, ज्याला स्पर्मासेटी असं म्हटलं जातं. व्हेलचा शिकार करणाऱ्यांना हे वीर्य वाटतं. त्यामुळे याचं नाव स्पर्म व्हेल पडलं. पूर्णपणे विकसीत झालेली स्पर्म व्हेल एका स्कूल बस एवढी मोठी असते. ४९ ते ५९ फूट लांबी आणि ३५ ते ४५ टन वजन असू शकतं.
स्पर्म व्हेलच्या उलटीला एम्बरग्रिस म्हटलं जातं. पण स्पर्मव्हेलची प्रत्येक उलटी एम्बरग्रिस नसते. कारण व्हेल स्क्विड आणि कटल फिशची चोच पचवू शकत नाही. हे उलटी करून व्हेल बाहेर काढते. पण अनेकदा हे व्हेलच्या आतड्यांमध्येच राहतं. आतड्यांमध्ये हलल्यानंतर छोटे छोटे तुकडे एकत्र जमा होतात. यात गोंदासारखं काम करतं बाइल. हा व्हेलच्या लिव्हरमधून निघणारा पाचक रस आहे. अशाप्रकारे व्हेलच्या आतड्यांमध्ये एम्बरग्रिस तयार होतं. काही लोकांचं मत आहे की, व्हेल एम्हरग्रिसची उलटी करते तर काही लोक म्हणतात की, हे व्हेल विष्ठेच्या रूपात बाहेर काढते.
एकदा जर स्पर्म व्हेलने एम्बरग्रिस शरीरातून बाहेर काढलं तर त्यावेळी तो चिकट आणि काळ्या रंगाचा पदार्थ असतो. हा पदार्थ पाण्यावर तरंगतो. त्यावेळी यातून दुर्गंधी येऊ लागते. पण कालांतराने समुद्रातील पाण्यामुळे आणि उन्हामुळे याची दुर्गंधी कमी होऊ लागते.
काळ्या रंगाचा पदार्थ आता ग्रे आणि नंतर पांढऱ्या रंगाचा होतो. यावेळी हा पदार्थ मेणासारखा झालेला असतो. जसजसा रंग बदलत जातो तसतशी दुर्गंधीची जागा सुगंध घेऊ लागतो. समुद्रातली लाटांवर तरंगत तरंगत एम्बरग्रिस किनाऱ्यावर येतं. पण अनेकदा याला अनेक वर्ष लागतात. काळानुसार याचा सुगंधही वाढतो. त्यामुळे एम्बरग्रिस जेवढा जास्त वेळ समुद्रावर तंरगेल तेवढी त्याची जास्त किंमत मिळते.
एम्बरग्रिसमधून एक पदार्थ काढला जातो त्याला एम्बरीन असं म्हणतात. याला सुगंध नसतो. पण हा पदार्थ परफ्यूममध्ये मिश्रित केल्यात त्याचा सुगंध जास्त वेळ टिकून राहतो. मनुष्य परफ्यूमसाठी साधारण १ हजार वर्षांपासून एम्हरग्रिसचा वापर करत आहेत. पण अनेकवर्ष कुणाला हे माहितच नव्हतं की, ही मुळात व्हेलची उलटी आहे.
स्पर्म व्हेलमधील कमीच व्हेल एम्बरग्रिस तयार करतात. त्यामुळेच याची इतकी किंमत मिळते. काळ्या एम्बरग्रिसमध्ये एम्बरीन कमी असतं. त्यामुळे याची किंमत कमी असते. रंगासोबतच एम्बरीनचं प्रमाणही वाढतं आणि यालाच सर्वात जास्त किंमत मिळते.
ज्या परफ्यूममध्ये एम्बरग्रिसचा वापर होतो, तेही फार महागडे विकले जातात. जुन्या काळात एम्बरग्रिस स्पर्म व्हेलच्या शिकारीचं कारण ठरत होतं. पण नंतर एम्बरग्रिस फार महागडं असतं, त्यामुळे परफ्यूम तयार करणाऱ्या कंपन्या सिंथेटिक एम्बरग्रिसकडे वळाल्या. पण आजही व्हेलच्या उलटीला चांगलीच मागणी आहे.
समुद्रातील तरंगत्या एम्बरग्रिसला एकत्र केल्याने व्हेलला काहीही नुकसान पोहोचत नाही. तरी सुद्धा जगातल्या अनेक सरकारांनी एम्बरग्रिसच्या वापरावर बंदी घातली आहे. जेणेकरून स्पर्म व्हेलच्या शिकारीत वाढ होऊ नये. एम्बरग्रिसचा वापर केवळ परफ्यूमसाठी होतो असं नाही तर अरबमध्ये याला अनबर म्हणतात. याचा वापर धूप आणि हृदयाच्या औषधांसाठीही केला जातो.