School Bus Colour : पूर्वी मुलं-मुली शाळेत पायी, बैलगाडीने किंवा सायकलने जात असत किंवा मग एसटी बसने जात असत. आजकाल स्कूल बसचा सुळसुळाट झाला आहे. नर्सरीपासून ते कॉलेजपर्यंत स्कूल बसने ये-जा केली जाते. आपणही स्कूल बस नक्कीच पाहिल्या असतील. साधारणपणे सगळीकडेच म्हणजे देशात आणि देशाबाहेरही स्कूल बसचा रंग हा पिवळा दिसतो. पण आपल्याला कधी प्रश्न पडलाय का की, स्कूल बसचा रंग पिवळाच का असतो? जर पडला असेल तर याचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
स्कूल बसचा इतिहास
सामान्यपणे स्कूल बसचा इतिहास असा आहे की, स्कूल बसच्या वापराची सुरूवात सर्वातआधी उत्तर अमेरिकेत १९व्या शतकात केली गेली. मात्र, त्यावेळी मोटार गाडी नसल्याने शाळेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी आणि घरी सोडण्यासाठी घोडा गाडीचा वापर केला जात होता.
मग नंतर २०व्या शतकाच्या सुरूवातीला घोडा गाडीऐवजी मोटार गाड्यांचा वापर सुरू झाला होता. ही गाडी लाकूड आणि धातूपासून तयार केलेली असायची. तर या गाड्यांना केशरी किंवा पिवळा रंग दिलेला असायचा. जेणेकरून या गाड्यांमध्ये वेगळ्या दिसून याव्यात.
कधी ठरला अधिकृत रंग?
स्कूल बसेसना अधिकृतपणे पिवळा रंग देण्याची सुरूवात १९३९ पासून उत्तर अमेरिकेत झाली होती. आता भारत, अमेरिका आणि कॅनडासहीत जगातल्या अनेक देशातील स्कूल बसेस या पिवळ्या रंगाच्याच असतात. आता हा रंग या गाड्यांची ओळख बनला आहे.
सुप्रीम कोर्टाचे आदेश
सुप्रीम कोर्टाने देखील स्कूल बसेसबाबत अनेक दिशा-निर्देश जारी केले आहे. ज्यानुसार, खाजगी स्कूल बसेसचा रंग पिवळाच असावा. त्यासोबतच स्कूल बसच्या पुढे आणि मागे 'School Bus' लिहिलेलं असावं. आणि जर स्कूल बस रेंटने घेतली असेल तर त्यावर 'स्कूल बस ड्यूटी' लिहिणं गरजेचं आहे.
पण पिवळा रंगच का?
इतिहास वैगेर ठीके, पण स्कूल बसेस पिवळ्या रंगाच्याच का असतात? तर यामागे एक वैज्ञानिक आणि सुरक्षेचं कारण आहे. १९३० मध्ये अमेरिकेत झालेल्या एका रिसर्चमध्ये हे स्पष्ट झालं होतं की, पिवळा रंग हा इतर रंगांच्या तुलनेत लवकर दृष्टीस पडतो. तसेच इतर रंगांमध्येही व्यक्तीचं लक्ष पिवळ्या रंगावर आधी जातं. वैज्ञानिकांनुसार, इतर रंगाच्या तुलनेत पिवळा रंग १.२४ पटीने अधिक आकर्षण असतं.
स्कूल बसला पिवळा रंग हा सुरक्षेच्या दृष्टीने दिला जातो. कारण असंही मानलं जातं की, पिवळा रंग असल्याने बस दूरूनही स्पष्ट दिसू शकते. सोबतच पिवळ्या रंगाची बस पावसात, रात्रीही स्पष्ट दिसते. त्यामुळे दुर्घटना होण्याचा धोकाही कमी असतो.
Web Summary : School buses are yellow for safety. Research shows yellow is more visible than other colors, attracting attention faster, even in poor conditions, reducing accident risks.
Web Summary : सुरक्षा के लिए स्कूल बसें पीली होती हैं। शोध से पता चलता है कि पीला रंग अन्य रंगों की तुलना में अधिक दिखाई देता है, खराब परिस्थितियों में भी दुर्घटनाओं के जोखिम को कम करता है।