शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

१०० रूपयांच्या नव्या नोटेवरील चित्र कशाचं? का या चित्राची केली निवड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 11:25 IST

रिझर्व बॅंक ऑफ इंडियाकडून लवकरच बाजारात नवीन १०० रूपयांची नोट जारी केली जाणार आहे. या नव्या नोटेचं डिझाइन काही दिवसांपूर्वीच जारी करण्यात आलं.

नवी दिल्ली : रिझर्व बॅंक ऑफ इंडियाकडून लवकरच बाजारात नवीन १०० रूपयांची नोट जारी केली जाणार आहे. या नव्या नोटेचं डिझाइन काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आलं. या नोटेच्या मागच्या बाजूला यूनेस्कोच्या यादीतील गुजरातच्या पाटन येथील राणीच्या विहिरीचा फोटो देण्यात आला आहे. हा फोटो पाहून अनेकांच्या मनात या जागेबाबत उत्सुकता निर्माण झाली. कारण अनेकांना या जागेबाबत काहीच माहीत नाही. देशाची संस्कृती दर्शवण्यासाठी याचा वापर नोटेवर करण्यात आला आहे. 

राणीची विहीर

या ऐतिहासिक विहिरीचं निर्माण ११व्या शतकात सोलंकी साम्राज्यावेळी करण्यात आलं. यूनेस्कोने या राणीच्या विहिरीला वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये स्थान दिलंय. सरस्वती नदीच्या तटावर असलेल्या या विहिरीच्या खाली एक छोटा दरवाजा आहे. इतकेच नाही तर या विहिरीच्या आत ३० किमी अंतराचा एक बोगदाही आहे. पण सध्या हा बोगदा माती आणि दगडांच्या मदतीने बंद करण्यात आला आहे. राणीची विहीर ही ६४ मीटर लांब, २० मीटर रूंद आणि २७ मीटर खोल आहे. अशाप्रकरची देशातील ही एकच विहीर असल्याचे बोलले जाते. 

राणीच्या विहीरीतील कलाकृती

राणीच्या विहिरीमध्ये अनेक कलाकृती आणि मूर्तीं तयार करण्यात आल्या आहेत. या सर्व कलाकृती भगवान विष्णु यांच्याशी संबंधीत आहेत. इथे भगवान विष्णुंच्या दशावतार रूपाची मूर्ती तयार करण्यात आली आहे. राणीची ही विहीर मारू-गुर्जरा आर्किटेक्चर स्टाइलमध्ये एका कॉम्प्लेक्समध्ये तयार करण्यात आली होती. आतल्या बाजूस एक मंदिरही आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, नवीन नोट पुढील महिन्यात बाजारात दाखल होणार आहे. नव्या नोटेचं प्रिंटींग सुरू झालं आहे. या नोटेंच गुजरात कनेक्शनही चांगलंच चर्चेत आहे. 

१०० रूपयांची मेड इन इंडिया नोट

१०० रूपयांची ही नवीन नोट पूर्णपणे भारतीय असेल. या नोटचा केवळ कागद आणि केवळ शाईच नाही तर टेक्निकही भारतीय असेल. मध्य प्रदेशच्या देवास स्थित रिझर्व बॅंकेच्या प्रेसमध्ये या नोटांची छपाई केली जात आहे.   

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकJara hatkeजरा हटके