शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

प्लास्टिक बॉटलच्या झाकणात रबर का लावलेलं असतं? फक्त डिझाइन नाही महत्वाचं असतं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 18:05 IST

Interesting Facts : अनेकांना वाटतं की, हे रबर केवळ डिझाइनसाठी लावलं जातं. पण असं काही नाहीये. याचं कारण काय असतं तेच पाहुया.

Interesting Facts : आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात, ज्यांचा वापर आपण रोज करतो, त्यांबाबत आपल्याला काही माहीत नसतं. आता कोल्ड ड्रिंकबाबतच घ्या. बरेच लोक रोज कोल्ड ड्रिंक पितात. आपणही रोज नाही, पण कधीना कधी कोल्ड ड्रिंक प्यायले असालच. पण आपल्याला कोल्ड ड्रिंकसंबंधी एक खास बाब माहीत नसेल. ती म्हणजे प्लास्टिकच्या बॉटलच्या झाकणाच्या आता गोल रबर डिस्क का लावली जाते. अनेकांना वाटतं की, हे रबर केवळ डिझाइनसाठी लावलं जातं. पण असं काही नाहीये. याचं कारण काय असतं तेच पाहुया.

कोरा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यात काही लोकांनी विचारलं होतं की, प्लास्टिकच्या बॉटलच्या झाकणाच्या आत रबर डिस्क का लावलेली असते. अनेकांनी याची वेगवेगळी कारणं सांगितली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवरही लोकांनी फोटो पोस्ट करून विचारलं की, झाकणामध्ये रबर डिस्क का असते? सामान्यपणे सगळे हेच उत्तर देतील की, आतील कोल्ड ड्रिंक लीक होऊ नये म्हणून रबर डिस्क लावली जाते.

का दिली असते रबर डिस्क?

झाकणात रबर डिस्क केवळ इतकंच काम नसतं. फूड सेफ्टी वर्क्स वेबसाइटनुसार, सगळ्यात आधी तर रबर रिंग बॉटल चांगल्या पद्धतीनं सील करण्यास मदत करते. यानं बॉटल एअरटाइट होते. ज्यामुळे आतील ड्रिंक बाहेर येत नाही. यात केमिकल रेसिस्टेंस प्रॉपर्टीही असते. त्याशिवाय कोल्ड ड्रिंकच्या बॉटलमध्ये रबर डिस्क असण्याचं कारण अनेकदा बॉटलमधील तापमान बदलल्यानं आतील प्रेशर वाढतं. ही रिंग ते प्रेशर सहन करते.

आपल्याला माहीत नसेल पण प्लास्टिकची झाकणं polyethylene terephthalate म्हणजेच PET पासून बनवले जातात. जेव्हा ते सूर्यकिरणांच्या संपर्कात येतात, तेव्हा रिअॅक्शनमुळे त्याचे कण कोल्ड ड्रिंकमध्ये मिक्स होतात. त्यामुळे आतील पेय दूषित होऊ शकतं. रबर लावलं असल्यानं याचा धोका कमी होतो.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स