शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावल्यावर न्यायाधीश पेनाची निप का तोडतात? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 15:26 IST

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहीत असेल की, फाशीची शिक्षा सुनावल्या न्यायाधीश पेनाची निप तोडतात. पण ते पेनाची निप का तोडतात?

भारतात असे अनेक गुन्हे घडले आहेत ज्यासाठी कोर्टाने गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोणत्याही न्यायाधीशासाठी फाशीची शिक्षा सुनावणं सोपं नसतं. पण काही गुन्ह्यासाठी अशी शिक्षा देण्याशिवाय दुसरा उपायही नसतो. त्यामुळे फार विचार केल्यानंतर नियमानुसार न्यायाधीश साहेबांना हा निर्णय घ्यावा लागतो. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहीत असेल की, फाशीची शिक्षा सुनावल्या न्यायाधीश पेनाची निप तोडतात. पण ते पेनाची निप का तोडतात? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर आज आम्ही देणार आहोत.

काय तोडतात पेनाची निप?

फाशीची शिक्षा सुनावल्यावर न्यायाधीश पेनाची निप तोडतात आणि असं करण्याला सिम्बॉलिक अॅक्ट म्हटलं जातं. स्वातंत्र्यानंतर भारतात पहिल्यांदा पेनाची निप १९४९ मध्ये तोडली गेली होती. तेव्हा महात्मा गांधी यांच्या हत्येप्रकरणी नथूराम गोडसे याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पंजाब उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी गोडसेला फाशीची शिक्षा सुनावली होती आणि त्यानंतर पेनाची निप तोडली होती. (हे पण वाचा :भारतीय नाण्यांवर वर्षाच्या खाली डॉट, स्टार अशी चिन्हे का असतात? जाणून घ्या अर्थ.....)

असं करण्याचं एक कारण नाही. यासाठी अनेक कारणे आहेत. असं म्हटलं जातं की, न्यायाधीशांसाठी कोणत्याही व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावणं फार कठिण असतं. ते पेनाची निप तोडून शिक्षा सुनावताना आतून होत असलेल्या त्रासाला व्यक्त करतात. यासोबतच त्यांचा असाही मानस असतो की, आता त्यांना पुन्हा अशाप्रकारची शिक्षा सुनावण्याची वेळ येऊ नये. (हे पण वाचा : Interesting Facts : रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर X असा साइन का दिलेला असतो? वाचा काय आहे कारण....)

त्यासोबतच असंही म्हटलं जातं की, न्यायाधीश पेनाची निप तोडतात कारण की, त्यांचा हा निर्णय बदलला जाऊ नये म्हणून. उच्च न्यायालय आणि राष्ट्रपती यांच्याशिवाय न्यायाधीशांचा निर्णय कुणीही बदलू शकत नाही. इतकंच काय तर स्वत: न्यायाधीशही नाही. त्यामुळेच पेनाची निप तोडून न्यायाधीश हे स्पष्ट करतात की, फाशीची शिक्षा सुनावल्यावर ती बदलली जाऊ शकत नाही.

न्यायाधीशांकडून पेनाची निप तोडण्याचं आणखी एक कारण आहे असं म्हटलं जातं की, न्यायाधीश पेनाची निप यासाठी तोडतात कारण तो पेन पुन्हा वापरला जाऊ नये. कारण त्या पेनाने एका व्यक्तीचा मृत्यू लिहिला जातो. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेCourtन्यायालय