शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जगभरात JCB चा रंग पिवळाच का असतो? काय आहे या मशीनचं खरं नाव....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 15:07 IST

JCB Colour : काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियात जेसीबीची जोरदार चर्चा रंगली होती की, जेसीबी पिवळ्या रंगाचे का असतात? हे तुम्हाला माहीत आहे का? जेसीबी दुसऱ्या रंगाचे का नसतात?

JCB Colour : आजकाल कोणतंही खोदकाम करायचं असेल तर मजुरांऐवजी तिथे मशीन काम करताना दिसते. खासकरून जेसीबी आल्यापासून सगळी कामे सोपी झाली आहेत. सामान्यपणे सगळ्या जेसीबींचा रंग हा पिवळाच असतो. 

काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियात जेसीबीची जोरदार चर्चा रंगली होती की, जेसीबी पिवळ्या रंगाचे का असतात? हे तुम्हाला माहीत आहे का? जेसीबी दुसऱ्या रंगाचे का नसतात? चला जाणून घेऊ या प्रश्नांची उत्तरे...

जेसीबीच्या रंगाबाबत काही जाणून घेण्याआधी या मशीनच्या काही अनोख्या गोष्टीही जाणून घेऊ. जेसीबी ही ब्रिटनची मशीन तयार करणारी एक कंपनी आहे. या कंपनीचं मुख्यालय इंग्लंडच्या स्टॅफर्डशायर शहरात आहे. तर याचे प्लांट वेगवेगळ्या ठिकाणी आहेत.

जेसीबी ही जगातली पहिली अशी मशीन आहे, जी नावाशिवायच १९४५ मध्ये लॉन्च केली होती. ही मशीन तयार करणारे अनेक दिवस या मशीनच्या नावाचा विचार करत होते. पण त्यांना वेगळं काही न सुचल्याने ही मशीन तयार करणारे जोसेफ सायरिल बमफोर्ड यांचच नाव मशीनला देण्यात आलं.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जेसीबी ही भारतात फॅक्टरी उभारणारी पहिली खाजगी कंपनी आहे. आज जगभरात जेसीबी मशीनची सर्वात जास्त निर्यात भारतात केली जाते. १९४५ मध्ये जोसेफ सायरिल बमफोर्ड यांनी सर्वात पहिली मशीन एक टीपिंग ट्रेलर तयार केली होती. त्यावेळी ही मशीन बाजारात ४५ पौंड म्हणजे आजच्या मूल्यानुसार ४ हजार रूपयांना विकली गेली होती.

जगातला पहिला सर्वात वेगवान ट्रॅक्टर 'फास्ट्रॅक' जेसीबी कंपनीने १९९१ मध्ये तयार केला होता. या ट्रॅक्टरचा जास्तीत जास्त वेग हा ६५ किलोमीटर प्रति तास होता.  आता जाणून घेऊ की, जेसीबी मशीन्स पिवळ्या रंगाच्या का असतात? जेसीबी मशीनला सुरूवातीच्या काळात पांढरा आणि लाल रंग दिला जात होता. नंतर मशीनला पिवळा रंग देण्यात आला. 

यामागे तर्क असा आहे की, पिवळ्या रंगामुळे जेसीबी खोदकाम केल्या जाणाऱ्या जागेवर सहजपणे दिसेल. दिवस असो वा रात्र जेसीबी स्पष्टपणे दिसेल. याने लोकांना हेही कळेल की, पुढे खोदकाम सुरू आहे.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके