Railway Interesting Facts: रेल्वेनं प्रवास करणं हा एक फारच आनंद देणारा आणि वेगळा अनुभव असतो. खासकरून जेव्हा प्रवास लांब पल्ल्याचा असेल तर मज्जाच मज्जा. रेल्वेने प्रवास करताना लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच वेगवेगळ्या गोष्टी ऑब्जर्व्ह करत असतात. अनेक गोष्टींबाबत जाणून घेण्याची लोकांमध्ये मोठी उत्सुकता असते. रेल्वेचा प्रवास पूर्ण झाल्यावरही रेल्वेच्या अनेक गोष्टी डोक्यात तशाच राहतात. जसे की, रेल्वेचा हॉर्न. रेल्वे स्टेशनच्या जवळ राहणाऱ्या लोकांच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की, अनेकदा पहाटे ३ वाजताच रेल्वेच्या हॉर्नचा आवाज येतो. पण पहाटे ३ वाजता रेल्वेचा हॉर्न का वाजवला जातो? तेच आज आपण पाहणार आहोत.
रेल्वेच्या हॉर्नचे प्रकार
पहाटे ३ वाजता रेल्वेचा हॉर्न का वाजवला जातो, याचं कारण जाणून घेण्याआधी आपण रेल्वेच्या हॉर्नचे प्रकार जाणून घेणार आहोत. रिपोर्टनुसार, रेल्वेचे हॉर्न वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि प्रत्येक हॉर्न वेगळी परिस्थिती दर्शवतो. उदा.
एक लांब हॉर्न – प्रवाशांना थांबण्याचा संकेत
दोन छोटे हॉर्न – प्रवास सुरू करण्याची तयारी
चार छोटे हॉर्न – तांत्रिक बिघाड
सहा छोटे हॉर्न – आपत्कालीन परिस्थिती
एक लांब आणि एक छोटा हॉर्न – ब्रेक सिस्टिम सेट करण्याचा संकेत
भारतीय रेल्वेमध्ये मुख्यपणे ११ प्रकारचे हॉर्न सिग्नल वापरले जातात. यामध्ये एक लांब व दोन छोटे (चेन पुलिंग/गार्ड ब्रेक), दोन लांब व दोन छोटे (इंजिन कंट्रोल), तसेच थांबून-थांबून दिला जाणारा हॉर्न (रेल्वे क्रॉसिंग) यांचा समावेश आहे. हे सिग्नल लोको पायलट आणि गार्ड यांच्यातील संवादासाठी वापरले जातात.
स्वच्छतेसाठी वाजतो हॉर्न
आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, रेल्वे यार्डमध्ये धुलाई व साफसफाईसाठी जातानाही हॉर्न दिला जातो. जेव्हा रेल्वेला स्वच्छतेसाठी नेण्यात येते, तेव्हा लोको पायलट स्टेशनवर छोटा हॉर्न देतो. यावरून बाहेरील लोकांना कळते की रेल्वे यार्डमध्ये साफसफाईसाठी जाणार आहे.
सकाळी ३ वाजताच हॉर्न का वाजतो?
रिपोर्ट्सनुसार, रेल्वेचा हॉर्न पहाटे ३ वाजताही प्रामुख्याने सुरक्षेच्या कारणांसाठी वाजवला जातो. उदा. रुळांवर असलेली माणसं किंवा प्राणी यांना सावध करण्यासाठी, लेव्हल क्रॉसिंग ओलांडताना, स्टेशनवरून निघताना आवश्यक सिग्नल देण्यासाठी. रात्री किंवा पहाटे अनेकदा लोक किंवा प्राणी अनवधानाने रुळांच्या जवळ असतात. अशावेळी हॉर्न त्यांना सावध करतो आणि सुरक्षित अंतर ठेवण्याचा इशारा देतो. मुख्यपणे लोको पायलटला नियंत्रण ठेवायचे असेल किंवा एखादी आपत्कालीन स्थिती असेल, तर हॉर्न देणे अत्यावश्यक ठरते.
हॉर्न वाजवण्याची मुख्य कारणे समजून घ्या
रात्री किंवा पहाटे रुळांच्या जवळ माणसं किंवा प्राणी (हत्ती, जनावरे इ.) असू शकतात. हॉर्नमुळे अपघात टळतो. ज्या ठिकाणी फाटक नसलेली लेव्हल क्रॉसिंग असते, तिथे हॉर्न वाजवणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. लोको पायलट आणि गार्ड यांच्यातील संवादासाठी हॉर्न वापरला जातो. उदा. तीन छोटे हॉर्न = आपत्कालीन स्थिती, तर इतर पॅटर्न ब्रेक चेक किंवा रेल्वे सुरू करण्यासाठी असतात. स्टेशनवरून निघण्यापूर्वी गार्डला सिग्नल देण्यासाठीही हॉर्न वाजवला जातो.
Web Summary : Train horns at 3 AM serve safety purposes, alerting people or animals near tracks. Different horn signals communicate various messages between the loco pilot and guard, including emergencies and starting procedures. Horns also indicate when a train is going for cleaning.
Web Summary : ट्रेन का हॉर्न सुबह 3 बजे सुरक्षा कारणों से बजता है, जो पटरियों के पास लोगों या जानवरों को सचेत करता है। विभिन्न हॉर्न संकेत लोको पायलट और गार्ड के बीच आपात स्थिति और शुरुआती प्रक्रियाओं सहित विभिन्न संदेशों का संचार करते हैं। हॉर्न यह भी इंगित करता है कि ट्रेन सफाई के लिए जा रही है।