शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या सुरूवातीला किंवा शेवटीच का असतात जनरल डबे? कारण असं जे तुम्हालाही माहीत नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 12:58 IST

Indian Railway : प्रत्येक रेल्वेचं स्ट्रक्चर जवळपास एकसारखं असतं. म्हणजे इंजिननंतर किंवा सगळ्यात मागे जनरल डबा आणि मधे AC-3, AC-2 आणि स्लीपर कोच लावलेले असतात.

Indian Railway : भारतीय रेल्वे नेटवर्क ही जगातलं तिसरं सगळ्यात मोठं नेटवर्क मानलं जातं. लाखो लोक रेल्वे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. यावेळी प्रवाशांची सुविधा, सुरक्षा दोन्ही गोष्टींची काळजी घेतली जाते. बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की, प्रत्येक रेल्वेमध्ये जनरल डबा मधे का लावला जात नाही? जनरल डबा हा नेहमी मागे किंवा पुढच्या बाजूलाच का असतो? तर रेल्वेकडून याबाबतचं प्लानिंग विचार करूनच केलेलं असतं. रेल्वेमध्ये वेगवेगळ्या श्रेणीचे डबे लावले जातात, तेव्हाही प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षा याची काळजी घेतली जाते.

प्रत्येक रेल्वेचं स्ट्रक्चर जवळपास एकसारखं असतं. म्हणजे इंजिननंतर किंवा सगळ्यात मागे जनरल डबा आणि मधे AC-3, AC-2 आणि स्लीपर कोच लावलेले असतात. जनरल डबे मागे किंवा पुढे लावण्यावर एका प्रवाशाने तर रेल्वेवरच जनरल डबे प्रवाशांच्या जीवाशी खेळ करण्याचा आरोप लावला आहे. 

ट्विटरवर त्याने आरोप लावला की, रेल्वेचे जनर डबे यासाठी रेल्वेच्या मागे किंवा पुढे असतात जेणेकरून दुर्घटना झाल्यावर सगळ्यात जास्त नुकसान गरीब प्रवाशांचं व्हावं. पण रेल्वे विभागाने त्याचे आरोप फेटाळून लावत सांगितलं की, रेल्वे संचालनाच्या नियमांनुसारच डब्यांची जागा ठरते. यात श्रेणी महत्वाची नसते.

या कारणाने जनरल डबे मागे-पुढे असतात

जनरल डब्यांना या क्रमात प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षा ध्यानात ठेवून लावले जातात. सोबतच जनरल डबे मागे-पुढे लावल्याने रेल्वेचा बॅलन्सही बरोबर राहतो. कोणत्याही रेल्वेच्या जनरल डब्यांमध्ये सगळ्यात जास्त गर्दी असते. अशात जर जनरल डबे मधे असले तर जास्त भार मधे पडेल आणि यामुळे रेल्वेचं संतुलन बिघडू शकतं. असं झालं तर बोर्ड-डीबोर्डमध्ये अडचण येऊ शकते. जनरल डबे मधे ठेवले तर सिटींग अरेंजमेंटसोबत इतर व्यवस्थाही व्यवस्थित होणार नाही. यामुळे प्रवाशी त्यांचं सामान घेऊन एकीकडून दुसरीकडे जाऊ शकणार नाहीत. याच कारणाने जनरल डबे प्रवाशांच्या सोयीसाठी दोन कोपऱ्यांवर लावले जातात.

इमरजन्सीमध्ये वाचतो जीव

रेल्वे एक्सपर्ट्स यांचं यावर मत आहे की, जनरल डबे रेल्वेच्या दोन्ही टोकांवर असणं सेफ्टीच्या दृष्टीनेही चांगलं आहे. असं केल्याने जनरल डब्यांमध्ये होणारी गर्दी अंतरामुळे दोन भागांमध्ये विभागली जाते. याने कोणत्याही आपातकालीन स्थितीत लोकांना रेल्वेतून बाहेर निघणं सोपं होतं.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके