शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
4
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
5
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
6
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
7
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
8
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
9
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
10
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
11
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
12
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
13
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
14
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
15
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
16
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
18
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
19
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
20
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
Daily Top 2Weekly Top 5

श्वान जीभ बाहेर काढून श्वास घेत का बसतात? तुम्हालाही माहीत नसेल याचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 15:06 IST

Why Dogs Hang Their Tongues Out When They Pant : थकल्यानंतर ते जीभ बाहेर काढून श्वास घेत बसतात. पण कधी विचार केलाय का की, श्वान जीभ बाहेर काढून का श्वास घेत बसतात? चला जाणून घेऊ याचं उत्तर...

Why Dogs Hang Their Tongues Out When They Pant : पाळीव प्राण्यांमध्ये लोक सगळ्यात जास्त श्वान पाळतात. श्वानांना शिकवणं सोपं मानलं जातं आणि एकदा जर ते तुम्ही शिकवल्याप्रमाणे शिकले तर त्यांच्यासारखा इमानदार प्राणी दुसरा नसतो. श्वानांसोबत एकदा लळा लागला की, तो कमी होत नाही. ते सुद्धा आपल्यावर प्रेम करतात. जेव्हा त्यांनी कुणाला ओळखलं किंवा त्यांना लाड करून घ्यायचे असतात तेव्हा ते शेपूट हलवतात आणि भूंकतात. थकल्यानंतर ते जीभ बाहेर काढून श्वास घेत बसतात. पण कधी विचार केलाय का की, श्वान जीभ बाहेर काढून का श्वास घेत बसतात? चला जाणून घेऊ याचं उत्तर...

श्वानांचं शरीर हे इतर प्राण्यापेक्षा वेगळं असतं. त्यामुळे त्यांच्या शरीराच्या क्रिया सुद्धा वेगळ्या असतात. म्हणजे आपण मनुष्यांना जेव्हा गरमी होते. तेव्हा आपला घाम निघतो. हा घाम आपल्या घामाच्या ग्रंथी म्हणजे स्वेट ग्लॅंडमधून निघतो. तेच श्वानांमध्ये घामाची कोणतीही ग्रंथी नसते. त्यांच्या पंजा आणि जिभेला घाम येतो. त्यामुळे जास्त धावल्यावर किंवा जास्त उष्णता जाणवल्यावर श्वान जीभ काढून श्वास घेत बसतात. याने त्यांच्या शारीरिक सिस्टीमला पुरेसं ऑक्सिजन मिळतं. सोबतच जीभ बाहेर काढून श्वान गरमीलाही कंट्रोल करतात.

(Image Credit : dogtime.com)

जर तुमच्या घरात डॉगी असेल तर तुम्ही पाहिलं असेल की, त्यांना गरमी होते तेव्हा ते जीभ काढून श्वास घेत बसतात. अशात त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यांची काळजी घ्या. त्यांच्या आजूबाजूला थंड वातावरण ठेवा, सोबतच त्यांनी पाणी द्या. जेणेकरून त्यांना थंड वाटेल.जर पाणी दिल्यानंतरही किंवा थंड वातावरणामुळेही त्यांना आराम मिळत नसेल तर वेळीच त्यांना डॉक्टरांना दाखवा. कारण आपल्यासारखीच श्वानांना देखील उष्णतेमुळे समस्या होते. 

श्वांनाना उष्णतेची सगळ्यात जास्त समस्या यामुळे होते कारण त्यांना इतर प्राण्यापेक्षा जास्त गरमी होते. यात सगळ्यात जास्त गरमी यूरोपीय प्रजातीच्या श्वानांना लागते.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेdogकुत्रा