Knowledge News: आजकाल जास्तीत जास्त लोकांना नेहमीच डॉक्टरांकडे फेऱ्या माराव्या लागतात. कारण वेगवेगळे आजार काही पिच्छा सोडत नाहीत. डॉक्टर तपासतात आणि आजारानुसार एका चिठ्ठीवर औषधं लिहून देतात. सामान्यपणे ही चिठ्ठी वाचण्याच्या फंद्यात कुणी पडत नाही. कारण ती वाचून काही समजत नाही. ही चिठ्ठी थेट मेडिकल स्टोरवाल्याला दिली जाते. त्याना ती समजते आणि ते औषधं देतात. बरं हे जाऊ द्या... याच चिठ्ठीवर डॉक्टर सर्वातआधी Rx असं लिहितात किंवा ते आधीच प्रिंट केलेलं असतं. पण याचा अर्थ अनेकांना माहीत नसतो. ही नेहमीची पण तेवढीच महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला माहीत असली पाहिजे.
Rx चा नेमका अर्थ काय?
औषधाच्या चिठ्ठीवर डाव्या बाजूला लिहिलेल्या Rx चा अर्थ 'Recipe' असा होतो. हा एक लॅटीन शब्द आहे. ज्याचा अर्थ होतो 'To take'. म्हणजेच डॉक्टरांनी चिठ्ठीवर जे काही लिहून दिलं आहे ते रूग्णाला घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टर जेव्हा चिठ्ठीवर Rx लिहितात तेव्हा ते सावधगिरी बाळगण्यासही सांगतात. डॉक्टर त्यावर काही गोष्टी अशा लिहितात ज्या रूग्णांनी व्यवस्थित फॉलो करायच्या असतात.
इतरही काही शॉर्ट फॉर्म
आपण पाहिलं असेल की, याच चिठ्ठीवर Rx सोबतच इतरही काही कोड वर्ड्सचा वापर केलेला असतो. जसे की, एखाद्या औषधासोबत Amp लिहिलं असेल तर याचा अर्थ होतो की, हे औषध रात्री जेवणाआधी घ्यायचं आहे. तेच जर AQ लिहिलं असेल तर त्याचा अर्थ आहे की, हे पाण्यासोबत घ्यायचं आहे. एखाद्या औषधासोबत BID लिहिलं असेल तर याचा अर्थ होतो की, हे औषध दिवसातून दोनदा घ्यायचं आहे.
अनेकदा तर औषधांचं नाव लिहिण्यासाठीही शॉर्ट फॉर्मचा वापर केला जातो. जसे की, बर्थ कंट्रोल पिल्ससाठी BCP आणि अॅस्प्रिनसाठी ASA चा वापर केला जातो. तसेच ईयर ड्रॉपसाठी AU या शॉर्ट फॉर्मचा वापर केला जातो. ज्याचा अर्थ ड्रॉप दोन्ही कानात टाकायचा आहे.
त्याचबरोबर काही टेस्टसाठीही अशाप्रकारच्या शॉर्ट फॉर्म्सचा वापर केला जातो. जसे की, चेस्ट एक्स-रे साठी CXR आणि हृदयासंबंधी आजारासाठी CV. तेच कम्प्लिट ब्लड काउंटसाठी CBC चा वापर केला जातो.