शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

अच्छा तर 'हे' आहे दुसऱ्यांना जांभई देताना बघून आपल्याला जांभई येण्याचं कारण, पाहा असं का होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 17:17 IST

Why do we yawn when see other : जर बाजूची किंवा समोरची एखादी व्यक्ती आपल्यासमोर जांभई देत तेव्हा आपल्याला सुद्धा जांभई येते. मुळात दोन्ही व्यक्ती वेगळ्या असतात, तरी असं का होतं?

Why do we yawn when see other : गाडीतून प्रवास करत असताना आपल्यालाही अनुभव आला असेल की, कार ड्रायव्हरसोबत समोर बसलेल्या व्यक्तीला झोपण्यास सक्त मनाई असते. कारण काय तर बाजूच्या व्यक्तीला बघून ड्रायव्हरला सुद्धा झोप येऊ शकते. असाच एक वेगळा प्रकार म्हणजे जांभईचा. जर बाजूची किंवा समोरची एखादी व्यक्ती आपल्यासमोर जांभई देत तेव्हा आपल्याला सुद्धा जांभई येते. मुळात दोन्ही व्यक्ती वेगळ्या असतात, तरी असं का होतं? कुणालाही हे विचित्र वाटणारंच आहे. अनेकांना हा प्रश्नही पडत असेल, पण सहजपणे उत्तर मिळत नसेल. आज आपण यामागचं वैज्ञानिक कारण समजून घेणार आहोत.

का होतं असं?

दुसऱ्यांना जांभई देताना बघून आपल्याला सुद्धा कधीना कधी जांभई आली असेल आणि प्रश्नही पडला असेल की, असं का होतं? दुसऱ्यांना बघून आपल्यालाही जांभई येणं एखादं बॅक्टेरिअल किंवा व्हायरल इन्फेक्शन तर नाही ना?  असंही वाटलं असू शकतं. पण असं काही नाहीये. मुळात असं होण्याचा संबंध मेंदुशी आहे.

इटालियन वैज्ञानिकानुसार, याच्यामागे एका खास न्यूरॉनचा हात असतो. या न्यूरॉनला 'मिरर न्यूरॉन' असं म्हणतात. जसं की, नावावरून समजतं की, हे न्यूरॉन व्यक्तीची प्रतिछाया तयार करतात. 

या न्यूरॉनचा संबंध काहीही नवीन शिकणे, नक्कल करणे आणि सहानुभूती दाखवण्यासंबंधी आहे. याचा शोध जियाकोमो रिजोलाटी नावाच्या न्यूरो बायोलॉजिस्टने लावला होता. मनुष्यावर जेव्हा याबाबत अभ्यास झाला तेव्हा समजलं की, हे न्यूरॉन तंतोतंत तेच काम करतात जे समोरची व्यक्ती करत असेल. दुसऱ्या व्यक्तीचे न्यूरॉन अ‍ॅक्टिव होऊन त्यांनाही तसंच करण्यास सांगतात.

मिरर न्यूरॉन मेंदुचे चार भाग, प्री मोटर, इंफीरियर फ्रंटल गायरस, पेराइटल लोब आणि सुपीरियल टेम्पोरल सुलकसमध्ये आढळतात. मेंदुच्या चारही भागांच्या काम करण्याच्या क्षमतेवर हे न्यूरॉन आपला प्रभाव पाडतात. पण ऑटिज्म, सीज़ोफ्रीनिया आणि मेंदुसंबंधी आजारामध्ये हे न्यूरॉन प्रभावित होतात आणि ते आधीसारखं प्रभावी काम करत नाहीत. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके