(Image Credit : ndtv)
जास्तीत जास्त लोक उन्हाळ्याची आतुरतेने वाट बघत असतात कारण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे गोड गोड आंबे खायला मिळतात. काही लोकांना माहिती नसेल की, भारतात जवळपास १५०० प्रकारच्या आंब्यांच उत्पादन घेतलं जातं. कमालीची बाब ही आहे की, या सर्वच आंब्यांची टेस्ट वेगळी आणि मोहात पाडणारी असते. जसे की, हापूस, लंगडा आंबा, बदामी आंबा, केशर आंबा हे जरा जास्तच लोकप्रिय आहेत.
यातील लंगडा आंबा हा अनेकांना जरा वेगळ्या कारणासाठी बुचकळ्यात टाकून जातो. तो असा की, या आंब्याचं नाव लंगडा आंबा का पडलं असावं? म्हणजे एखाद्या फळाचं नाव लंगडा कसं असू शकतं आणि हे नाव मिळालं तरी कसं? जर तुमच्याही मनात हा हे प्रश्न उपस्थित होत असतील तर चला जाणून घेऊ याचं उत्तर.
लंगडा आंब्याचा इतिहास
लंगडा आंब्याबद्दल जेव्हा पद्मश्री हाजी कलीमुल्लाह यांनी सांगितलं की, लंगडा आंब्याची शेती साधारण २५० ते ३०० वर्षांपूर्वी बनारसच्या काशीमध्ये सुरु करण्यात आली होती. हाजी कलीमुल्लाह सांगतात की, खूप वर्षांपूर्वी बनारसमध्ये एक पायाने अपंग व्यक्ती राहत होती. त्याच्या जवळचे लोक त्याला प्रेमाने लंगडा म्हणूणच हाक मारायचे. या व्यक्तीने एकदा एक आंबा खाल्ला आणि त्याला तो फारच आवडला. त्याने या आंब्याची गुठळी घरातील अंगणात लावली. काही वर्षांनी या झाडाला भरपूर आंबे येऊ लागले. जे फारच स्वादिष्ट होते.
अनेक लोकांनाही या आंब्याची चव फारच आवडली. ज्यानंतर सर्वांनी मिळून त्या व्यक्तीच्या नावावर या आंब्याचं नाव लंगडा आंबा असं ठेवलं. त्यासोबतच कलीमुल्लाह यांनी हेही सांगितलं की, तशी तर भारतात वेगवेगळ्या भागांमध्ये लंगडा आंब्याचं उप्तादन घेतलं जातं, पण बनारसचा लंगडा आंबा वेगळाच आहे.
कलीमुल्लाह हे देशभरात आंब्याची शेती करण्यासाठी आणि सोबतच नवनवीन प्रजाती विकसित करण्यासाठी ओळखले जातात.