शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भारतात कुठे राहतात शोम्पेन जमातीचे लोक?; ज्यांना आजपर्यंत फारसं कुणी पाहिले नाही, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 13:23 IST

हे लोक जंगलात राहतात. शिकार आणि फळे फुलांवर ते निर्भर राहतात. शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ते करत नाहीत.

भारतात एक अशी जमात आहे ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. या जमातीला पाहण्याची संधीही खूप कमी लोकांनाच मिळाली आहे. या जमातीला शोम्पेन (shompen) जमात म्हटलं जाते. शोम्पेन जमात भारतातील ग्रेट निकोबार बेटावर राहते. जे अंदमान आणि निकोबार बेटांचा एक भाग आहे. या परिसर दूरदूरपर्यंत पसरलेल्या घनदाट जंगलाचा आहे. जिथे सर्व सामान्य लोक जाणे सोपे नाही.

कोण आहेत शोम्पेन लोक?

शोम्पेन लोक भारतातील सर्वात वेगळे आणि रहस्यमय जमातींपैकी एक मानले जातात. या लोकांचा बाहेरील जगताशी काही संपर्क नसतो. ते लोक आपल्या पारंपारिक जीवनशैलीत राहणे पसंत करतात. या लोकांची लोकसंख्याही फार कमी आहे. आधुनिक जीवनशैलीपासून ते लोक दूरच राहतात.

या लोकांचे जीवन कसे असते?

हे लोक जंगलात राहतात. शिकार आणि फळे फुलांवर ते निर्भर राहतात. शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ते करत नाहीत. त्यांची भाषा आणि संस्कृती वेगळी आहे. जी बाहेरील लोकांना कळणेही कठीण आहे. बाहेरील लोकांसोबत ते संपर्कात नसतात. त्यामुळे खूप कमी लोक त्यांना पाहू शकतात. 

दरम्यान, भारत सरकार या जमातीतील लोकांच्या सुरक्षेसाठी आणि तिथली संस्कृती वाचवण्यासाठी या भागात सर्वसामान्य लोकांना जाण्यावर निर्बंध लावते. त्यामुळेच शोम्पेन जमातीतील लोकांची कमी माहिती उपलब्ध आहे. शोम्पेन जमात ही भारतातील सर्वात अनोखी आणि रहस्यमय जमातींपैकी एक आहे, जी आजही निसर्गाच्या सानिध्यात आपली पारंपारिक जीवनशैली जगते.

२०२४ मध्ये पहिल्यांदाच केले मतदान

२०११ च्या जनगणनेनुसार शोम्पेन जमातीतील लोकांची संख्या २२९ इतकी आहे. २०२४ च्या निवडणुकीत अंदमान आणि निकोबार लोकसभा मतदारसंघात या जमातीतील ७ लोकांनी पहिल्यांदाच मतदान केले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shompen Tribe of India: Location, Lifestyle, and First-Time Voters

Web Summary : The Shompen, a secluded tribe of Great Nicobar, live traditionally, relying on nature. Numbering around 229, seven members voted for the first time in 2024. The government restricts access to protect their culture.
टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाandaman nicobar islands lok sabha election 2024अंदमान आणि निकोबार बेटे लोकसभा निवडणूक निकाल २०२४