शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Antilia आधी कुठे राहत होते मुकेश अंबानी आणि त्यांचा परिवार? आता त्या घरात कोण राहतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 15:21 IST

Mukesh Ambani House: अनेक सुविधा आणि आधुनिक टेक्नॉलॉजी असलेल्या एंटीलियाची किंमत १५००० कोटी सांगण्यात येते. मात्र, एंटीलियामध्ये राहण्याआधी मुकेश अंबानी यांचा परिवार कुठे राहत होता? 

Mukesh Ambani House: देश आणि आशियातील सगळ्यात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचं महागडं व आलिशान घर नेहमीच चर्चेचा विषय असतं.  मुकेश अंबानी यांचा संपूर्ण परिवार मुंबईतील सगळ्यात महाग अ‍ॅंटिलियामध्ये राहतो. २७ मजली हे घर जगातील सगळ्यात महागड्या घरांपैकी एक आहे. अनेक सुविधा आणि आधुनिक टेक्नॉलॉजी असलेल्या अ‍ॅंटिलियाची किंमत १५००० कोटी सांगण्यात येते. मात्र, अ‍ॅंटिलियामध्ये राहण्याआधी मुकेश अंबानी यांचा परिवार कुठे राहत होता? 

मुकेश अंबानी यांचा परिवारा अ‍ॅंटिलियाच्या आधी मुंबईच्या सी विंड अपार्टमेंटमध्ये राहत होते. मुंबईच्या कोलाबा येथील १४ मजली इमारतीलमध्ये पूर्ण अंबानी परिवार राहत होता. मुकेश अंबानी यांच्यासोबतच अनिल अंबानी यांचाही परिवार याच घरात राहत होता.

धीरूबाई अंबानी यांनी त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये या घराचा उल्लेख केला होता. या उंच इमारतीमध्ये घरातील प्रत्येक सदस्यासाठी एक फ्लोर होता. अनेक सोयी-सुविधा असलेल्या या इमारतीमध्ये अंबानी परिवार अनेक वर्ष सोबत राहिला. २०११ मध्ये मुकेश अंबानी आपल्या परिवारासोबत अ‍ॅंटिलियामध्ये शिफ्ट झाले.

कफ परेड रोडच्या सी विंड इमारतीमध्ये अनेक सोयी-सुविधा आहेत. पण 40000 स्क्वेअर फूट परिसरात असलेल्या अ‍ॅंटिलियासमोर ही इमारत डावीच आहे. मुंबईच्या अल्टमाउंड रोडवरील अ‍ॅंटिलियाला शिकागोचे आर्किटेस्ट पार्किंस अ‍ॅन्ड विले यांनी डिझाइन केलं.

मुकेश अंबानी अ‍ॅंटिलियामध्ये शिफ्ट झाल्यानंतर अनिल अंबानी सी विंड हाऊसमध्येच राहत होते. पण नंतर काही वर्षांनी ते आपल्या परिवारासोबत पाली हिल स्थित नवं घर Adobe मध्ये राहतात. 160000 वर्ग मीटरमध्ये असलेलं हे घरही आलिशान आहे. या घराची किंमत अंदाजे 5000 कोटी सांगितली जाते. तेच सी विंड येथील अंबानी यांच्या जुन्या घराची मालकी अनिल अंबानी यांच्याकडेच आहे.

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीJara hatkeजरा हटके