3E and 3A Coach Difference: रेल्वेचा प्रवास हल्ली सगळेच करतात. कारण रेल्वेचा प्रवास आरामदायक आणि स्वस्त असतो. देशातील जास्तीत जास्त लोक स्लीपर कोचने प्रवास करतात, तर काही लोक एसी कोचने प्रवास करतात. आपण पाहिलं असेल की, भारतीय रेल्वेत वेगवेगळ्या प्रकारचे कोच असतात. यात जनरलपासून ते फर्स्ट एसी यांचा समावेश असतो. स्लीपर क्लास एक असा कोच असतो, ज्यात प्रवाशाला बसायला आणि झोपण्यासाठी सीट मिळते. महत्वाची बाब म्हणजे स्लीपर क्लासचं तिकीटही फार जास्त नसतं. सोबतच रेल्वेत 3E आणि 3A असेही दोन कोच असतात. पण दोन्हीचा अर्थ काय आणि त्यात फरक काय हे अनेकांना माहीत नसतं. तोच जाणून घेऊया.
3E आणि 3A मध्ये काय फरक?
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त प्रवासी AC कोचने प्रवास करतात. भारतात AC कोच देखील वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जास्तीत जास्त लोकांना हेच माहीत असतं की, रेल्वे AC कोच तीन प्रकारचे असतात. फर्स्ट एसी, सेकंड क्लास एसी आणि थर्ड क्लास एसी. अनेकांना हे माहीत नसतं की, रेल्वे AC चा एक आणखी कोच असतो. त्याला 3E असं म्हणतात. तर थर्ड क्लास एसीला 3A म्हणतात. पण 3E आणि 3A मध्ये फरक काय? हे जाणून घेऊ.
3E ची नव्याने सुरूवात
भारतीय रेल्वेने प्रवाशांना स्वस्तात एसीमधून प्रवास करताना यासाठी 3E कोच चा पर्याय दिला आहे. याला इकोनॉमी म्हणजे 3E म्हटलं जातं. 3E कोच इतर सुविधांसाठी थर्ड एसी म्हणजे 3A सारखाच असतो. पण 3E चं तिकीट 3A पेक्षा बरंच कमी असतं. 3A कोचमध्ये 72 सीट असतात, तेच 3E कोचमध्ये 83 सीट असतात.
त्याशिवाय प्रत्येक सीटच्या प्रवाशांसाठी एसी डक वेगवेगळा लावला जातो. प्रत्येक सीटसाठी बॉटल स्टँड, प्रत्येक सीटसाठी रीडिंग लाइट आणि प्रत्येक सीटसाठी चार्जिंगची व्यवस्थाही 3A सारखीच असते. 3A कोच प्रमाणेच 3E कोचमध्येही बेडशीट आणि ब्लँकेट मिळतं. लांबचा प्रवास करणाऱ्यांसाठी 3A कोचने प्रवास चांगला ठरतो. गर्दी कमी राहते. तर 3E मध्ये जास्तीचे बर्थ असल्याने जागा जरा कमी असते आणि बर्थही अपेक्षेपेक्षा जरा लहान असतो.
Web Summary : Railways offer 3E and 3A AC coaches. 3E, or Economy, is cheaper than 3A, with more seats (83 vs 72). Both provide similar amenities like reading lights and bedding. 3A offers more space; 3E's berths are smaller.
Web Summary : रेलवे 3E और 3A एसी कोच प्रदान करता है। 3E, या इकोनॉमी, 3A से सस्ता है, जिसमें अधिक सीटें (83 बनाम 72) हैं। दोनों पढ़ने की रोशनी और बिस्तर जैसी समान सुविधाएं प्रदान करते हैं। 3A अधिक जगह प्रदान करता है; 3E की बर्थ छोटी हैं।