शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या कडेला वेगवेगळ्या रंगाचे माइल स्टोन का लावलेले असतात? जाणून घ्या अर्थ....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 13:31 IST

रस्त्याच्या कडेला असलेले 'माइल स्टोन' म्हणजेच मैलाचे दगड तुम्ही अनेकदा पाहिले असतील. या दगडांवर एखाद्या ठिकाणाचं अंतर आणि त्या ठिकाणाचं नाव दिलेलं असतं.

(Image Credit : nikhilmachcha.wordpress.com)

रस्त्याच्या कडेला असलेले 'माइल स्टोन' म्हणजेच मैलाचे दगड तुम्ही अनेकदा पाहिले असतील. या दगडांवर एखाद्या ठिकाणाचं अंतर आणि त्या ठिकाणाचं नाव दिलेलं असतं. या दगडांच्या वरच्या भागाला पिवळा, हिरवा, काळा, निळा आणि केशरी रंग दिलेला असतो. तर दगडाच्या खालच्या भागाला पांढरा रंग दिलेला असतो.

(Image Credit : Social Media)

पण तुम्हाला माहीत आहे का? माइल स्टोनला असे वेगवेगळे रंग का दिले जातात? अनेकदा हायवे किंवा एखाद्या गावातून जाताना तुम्ही हे दगड पाहिले असतील. पण त्यावर लिहिलेल्या अंतराशिवाय आणि गावांच्या नावांशिवाय दुसऱ्या गोष्टींवर लक्ष दिलं नसेल. मात्र, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, हे वेगवेगळे रंग फार कामाचे असतात. यांचा अर्थ फार कमी लोकांनाच माहीत असेल.

(Image Credit : Social Media)

जर रस्त्यावरून जात असताना तुम्हाला असा दगड दिसला ज्याच्या वरच्या भागाला पिवळा रंग दिला असेल, तर समजून घ्या की, तुम्ही नॅशनल हायवे म्हणजेच राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत आहात.

(Image Credit : Social Media)

जेव्हा तुम्हाला रस्त्याच्या कडेला हिरव्या रंगाचा माइल स्टोन दिसला तर समजा की, तुम्ही राष्ट्रीय महामार्गावर नाही तर राज्य महामार्गावर प्रवास करत आहात.

(Image Credit : Social Media)

अनेकदा तुम्ही माइल स्टोनच्या वरच्या भागाला काळा किंवा निळा रंग दिलेला पाहिला असेल. हा रंग दिसला तर समजा की, तुम्ही एखाद्या मोठ्या शहरात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आले आहात.

(Image Credit : IndiaMART)

तसेच तुम्हाला जर रस्त्याच्या कडेला केशरी रंगाची पट्टी असलेला माइल स्टोन दिसला तर समजा की, तुम्ही एखाद्या गावात आलात किंवा गावाच्या रस्त्याने प्रवास करत आहात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल