शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वेडिंग फोटोशूट सुरु असताना कपलच्या मागे लागला वळू, आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 12:43 IST

अलिकडे लग्नाच्या आठवणी जतन करुन ठेवण्यासाठी अनेक नवीन जोडपी वेडिंग फोटोशूट करु लागले आहेत. यासाठी मोठा खर्च करुन मोठमोठी तयारी केली जाते.

अलिकडे लग्नाच्या आठवणी जतन करुन ठेवण्यासाठी अनेक नवीन जोडपी वेडिंग फोटोशूट करु लागले आहेत. यासाठी मोठा खर्च करुन मोठमोठी तयारी केली जाते. असंच काहीसं ऑस्ट्रेलियातील ग्लेन मॅकी आणि एमी मॅकी यांनी केलं. लग्नाचा दिवस होता. वेडिंग शूटची खास तयारीही करण्यात आली होती. प्रोफेशनल फोटोग्राफर बोलण्यात आले होते. एकानंतर एक सुंदर फोटो घेतले जात होते. पण अशातच असं काही घडलं की, दोघांनाही जीव मुठीत घेऊन तेथून पळ काढावा लागला. 

ही घटना साऊथ वेल्सची आहे. ग्लेन आणि अॅमी लग्न बंधंनात अडकणार होते. एका डोंगरावर फोटोशूट सुरु होतं. यासाठी खास एका घोड्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. सगळंकाही फार सुंदर दिसत होतं. पण तेव्हाच एक वळू तिथे आला. तो चांगलाच संतापलेला होता. नवरी-नवरदेव आणि फोटोग्राफर यांच्या काही लक्षात येण्याआधीच तो वळू त्यांच्यामागे धावू लागला. मग काय! सगळेजण आपला जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळू लागले. 

घोड्याच्या ट्रेनरने 'डेली मेल'ला सांगितले की, 'आम्ही डोंगरावरुन खाली येत होतो आणि तेव्हाच वळू आमच्या दिशेने धावत येत होता. अॅमी वेडिंग गाऊन सांभाळत पळू लागली होती. वळू फार जवळ आला होता. हा फारच भीतीदायक अनुभव होता. पण नंतर आम्ही सर्वांना या झालेल्या प्रकारामुळे हसू कोसळलं'.

अॅमी आणि ग्लेन यांच्या लग्नाला या वळूने चांगलंच यादगार ठरवलं. आश्चर्याची बाब म्हणजे तिथे थोड्या अंतरावर लग्नाला आलेले पाहुणे मद्यसेवन करत होते. ते त्यात इतके मग्न होते की, त्यांना या घटनेबाबत काहीच माहीत नव्हतं. पण नंतर त्यांना हे कळाल्यावर त्यांनाही हसू आवरलं नाही. 

ग्लेन सांगतो की, 'जेव्हा वळू आमच्या मागे लागला तेव्हाचा फोटो घेऊन फोटोग्राफरने आमचं लग्नही नेहमीसाठी स्मरणात राहिल. आम्ही हे मजेदार फोटो आमच्या घरात लावू. मला नाही वाटत की, कुणालाही त्यांच्या लग्नात अशाप्रकारच्या फोटोग्राफीची संधी मिळाली असेल'. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल