शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

...अन् 'ति'ला 32 वर्षांनी सापडला लग्नाचा ड्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 20:15 IST

आईच्या लग्नाचा ड्रेस पाहण्यासाठी तिने शोधाशोध केली. तेव्हा एका बॅगमध्ये तिला लग्नाचा ड्रेस मिळाला पण तो आपल्या आईचा ड्रेस नाहीये याबाबत तिचं ठाम मत होतं...

सोशल मीडियामध्ये किती ताकद आहे याची कल्पना आता सर्वांनाच आली आहे. क्षणार्धात एखादी पोस्ट व्हायरल होते आणि जगभरात त्याबाबत चर्चा सुरू होते. सोशल मीडियाची हीच ताकद सिद्ध करणारी आणखी एक अनोखी घटना घडली आहे. एका महिलेला तब्बल 32 वर्षांनंतर तिने स्वतःच्या लग्नात घातलेला ड्रेस परत मिळाला आहे.अमेरिकेच्या ओहियो प्रांतातील ही घटना आहे. 4 फेब्रुवारी रोजी अॅमे बार्टलबाग (Ame Bartlebaugh) या तरूणीने तिच्या आईच्या लग्नाचा ड्रेस पाहण्यासाठी शोधाशोध केली. तेव्हा एका बॅगमध्ये तिला लग्नाचा ड्रेस मिळाला पण तो आपल्या आईचा ड्रेस नाही अशी तिची खात्री झाली. ज्या कोणा व्यक्तीचा हा ड्रेस असेल त्यांना तो परत मिळावा यासाठी अॅमेने या घटनेबाबत फेसबुकवर पोस्ट केले आणि 24 तासांच्या आत ओहियोच्या मिशेल हार्विल यांना 1985 पासून त्यांचा हरवलेला लग्नाचा ड्रेस मिळाला. 32 वर्षानंतर सापडलेला ड्रेस पाहून काय प्रतिक्रिया द्यावी हेच त्यांना समजत नव्हतं. दुसरीकडे, मिशेल यांच्याकडे आपल्या आईचा ड्रेस असेल अशी अपेक्षा अॅमे बार्टलबागला होती, पण तिची अपेक्षा फोल ठरली. कारण मिशेल यांच्याकडे भलताच कोणाचा तरी ड्रेस होता. त्यामुळे किमान पुढील वर्षी माझ्या लग्नाच्या आधीतरी माझ्या आईचा हरवलेला लग्नाचा ड्रेस मिळेल अशी आशा निराश झालेल्या अॅमे बार्टलबागने व्यक्त केली आहे. हा सर्व प्रकार ड्राय क्लिनरने केलेल्या घोळामुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याने ड्राय क्लिनिंग झाल्यावर दुस-याच बॅगमध्ये ड्रेस पॅक करून पार्सल पाठवले होते.