शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'ही' होती जगातील सर्वात सुंदर महिला, पण 'या' आजाराने केले जगातील सर्वात कुरुप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 18:16 IST

जगात एक अशी महिला होऊन गेली जी दिसायला खुप सुंदर होती. मात्र अचानक ती कुरुप झाली आणि जगात सर्वात कुरुप महिला म्हणून ओळखली जाऊ लागली...

जगात अनेक सौंदर्यवती आहेत. सौंदर्यवती स्पर्धांमध्ये तर अनेक ललना आपल्या सौंदर्याने भल्यभल्यांना घायाळ करतात. पण हे सौंदर्य किती काळ टिकेल याची काय खात्री? जगात एक अशी महिला होऊन गेली जी दिसायला खुप सुंदर होती. मात्र अचानक ती कुरुप झाली आणि जगात सर्वात कुरुप महिला म्हणून ओळखली जाऊ लागली. मेरी एम बेवन असे या महिलेचे नाव होते. चला तर मग जाणून घेऊया या महिलेची गोष्ट आणि ती जगात सर्वात कुरुप महिला का झाली?काही आजार असे असतात की ते काही व्यक्तींचे आयुष्य उद्भवस्त करून टाकतात. अशाच एका दुर्धर आजाराने या सुंदर युवतीचे आयुष्य कुरुप करून टाकले. जवळजवळ १४७ वर्षांपूर्वी म्हणजेच १८७४ साली तिचा जन्म झाला. ती प्रचंड सुंदर होती. लंडनमध्ये जन्म झालेली मेरी आठ मुलांमधील एक होती. ती दिसायला फार सुंदर होती. तिचे नर्स व्हायचे स्वप्न होते पण ते अर्धवट राहिले. तिचे लग्न झाले.डेली स्टार डॉट कॉम या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार मेरीचे लग्न झाले. तिला ४ मुले होती. त्यावेळी मेरीला अ‍ॅक्रोमेगाली नावाचा आजार झाला. ज्यात शरीरातील अवयव मोठे होत जातात व चेहरा आणि शरीर कुरुप दिसू लागतो. त्या दरम्यान तिच्या नवऱ्याचे निधन झाले. बिचारी मेरी एकटी पडली. तसेच तीची आर्थिक परिस्थीतीपण हलाखीची बनली. पण असं म्हणतात की प्रत्येक वाईट गोष्टीमध्ये चांगली गोष्ट दडलेली असते. मेरीच्या कुरुपतेमुळे तिला अर्थार्जनाचा मार्ग सापडला. अमेरिकेच्या एका सर्कशीत चित्रविचित्र दिसणाऱ्या माणसांचा शो होता. ज्यात मेरी सहभागी झाली. या शो मुळे तिला प्रसिद्धीही मिळाली व तिला पैसेही मिळु लागले.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके