शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अटक टाळण्यासाठी आरोपी झाडावर चढला; २४ तास तिथेच बसून राहिला; अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 16:39 IST

अटक टाळण्यासाठी आरोपी चढून बसला झाडावर; विनंत्या करूनही खाली येईना

प्रेयसीला मारहाण आणि आईला धमकी देण्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीनं भलताच कारनामा केला आहे. पोलीस अटकेसाठी पोहोचताच ही व्यक्ती थेट झाडावर चढली. पोलिसांनी आर्जवं विनंत्या करूनही त्यानं झाडावरून खाली उतरण्यास नकार दिला. 

'द सन युके'नं दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी २४ तासांहून अधिक वेळ झाडावरच होता. या दरम्यान खाली असलेले पोलीस त्याला आवाहन करत होते. मात्र आरोपी खाली उतरण्यास तयार नव्हता. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये हा अजब प्रकार घडला आहे. आईला धमकी दिल्याप्रकरणी पोलीस संबंधिताला अटक करण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. ५० वर्षीय प्रेयसीला आठवड्याभरापूर्वी मारहाण केल्याची तक्रारदेखील पोलिसांना त्याच्या विरोधात मिळाली होती.

पोलिसांनी अटक करण्यापूर्वी आरोपी त्याच्या घराच्या छतावर चढला. त्यानंतर तो बाजूलाच असलेल्या ३० फूट उंच झाडावर चढला. पोलीस बुधवारी त्याला पकडण्यासाठी पोहोचले. मात्र त्यानं संपूर्ण रात्र झाडावर काढली. पोलिसांनी त्याला खाली उतरवण्यासाठी विविध प्रयत्न केले. मात्र त्यांच्या हाती अपयश आलं.

पोलीस आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या तयारीत होते अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. आरोपी हिंसक नव्हता. मात्र तरीही पोलीस कठोर कारवाई करणार होते. पोलिसांवर विश्वास नसल्यानं आरोपी खाली उतरण्यास तयार नव्हता. आरोपीला एकदा दोन वर्षांचा तुरुंगवास घडला. मात्र त्या कालावधीत त्याच्यासोबत पोलिसांनी गैरवर्तन केलं होतं, असं शेजाऱ्यांनी सांगितलं.