शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

#VirushkaWedding : विरुष्काच्या लग्नावरून सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 17:49 IST

विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नानंतर सोशल मीडियावर मिम्स, जाेक्स आणि बातम्यांचा पाऊस पडला आणि सगळं काही विरुष्कामय झालं.

ठळक मुद्देआज विराटच्या लग्नाचे तर पोर स्टेटस आणि फोटो असे टाकायला लागले जसं काय चुलत्याच लग्न झालं अन् घरात काकी आली आहे.खंडोबाच्या दर्शनासाठी विराट आणि अनुष्का जेजुरीत दाखल. उधळला भंडारा. फेसबूक टाईमलाईन बघतोय की अनुष्काच्या लग्नाचा अल्बम हेच कळत नाहीए आता.

मुंबई : विराट आणि अनुष्काचं लग्न झालं आणि सोशल मीडियावर त्यांच्यासाठींच्या शुभेच्छांचा एकच पाऊस पडला. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघंही तरुणांसाठी रोल मॉडेल आहेत. त्यांचे फॅन फॉलोईंग अमाप आहे. क्रिकेट आवडत नसतानाही केवळ विराटच्या एका झलकसाठी मुली क्रिकेटकडे वळल्या तर, अनुष्का शर्माच्या प्रत्येक चित्रपटाला तरुणांनी मनमुरादपणे दाद दिलीय. त्यांची ही जोडी बॉलिवूड आणि क्रिकेट क्षेत्रातील सगळ्यात प्रसिद्ध जोडी म्हणायला हरकत नाही. मध्यंतरी त्यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत्या मात्र तेही खोटं ठरलं. त्यावेळी यांचे लग्न होणार की नाही याबाबत सगळ्यांनाच शंका होती. मात्र त्यानंतर ही दोघं पुन्हा एकत्र आले. त्यांच्यातील नातं पुन्हा उभं राहिलं. त्यामुळे आता हे दोघं कधी लग्न करणार असा प्रश्न साऱ्यांनाच पडला होता.

काहीच दिवसांपूर्वी क्रिकेटर झहिर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे विवाहबंधनात अडकले. त्यांच्या विवाहातही विरुष्काच्या लग्नाची चर्चा होती. बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रांना एकत्र आणणार्‍या सागरिका आणि झाहिरचं तर लग्न झालं मग आता विराट आणि अनुष्का केव्हा बंधनात अडकणार असे प्रश्न दोघांनाही विचारू लागले. मध्यंतरी एका कार्यक्रमात विराटला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी हा मंच माझं घर नसल्याने मी माझे वैयक्तिक गोष्टी इथं शेअर करू शकत नसल्याची स्पष्टोक्ती त्याने हजारो लोकांच्या उपस्थितीत दिली. त्यानंतर, त्यांच्या लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी दोघंही इटलीत जाऊन लग्न करणार असल्याची बातमी प्रसिद्ध माध्यमात आल्यानंतर ही अफवा असल्याचंही सांगण्यात आलं. मात्र ही इटलीत अगदी पद्धतशीरपणे त्यांचा विवाह सोहळा पार पडला.

विरुष्काचं तिथं लग्न लागलं आणि सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस सुरू झाला. त्यातीलच काही विनोद आम्ही तुमच्यासाठी आणलेले आहेत. वाचा आणि आनंद घ्या. 

आज विराटच्या लग्नाचे तर पोर स्टेटस आणि फोटो असे टाकायला लागले जस काय चुलत्याच लग्न झालं अन् घरात काकी आली आहे.

 

किड्स लग्न करतात आणि हनीमुनला जातात. अडल्ट्स हनीमुनचं डेस्टिनेशन ठरवतात आणि मग लग्न करतात. लेजंट्स हनीमून डेस्टिनेशनवरच लग्न करतात.

                 

खंडोबाच्या दर्शनासाठी विराट आणि अनुष्का जेजुरीत दाखल

                                                                                                                                                                 

फेसबूक टाईमलाईन बघतोय की अनुष्काच्या लग्नाचा अल्बम हेच कळत नाहीए आता.

 

 

 

यामध्ये तर कोणीतरी जीवनाचं सत्य सांगितलं आहे. कोणीतरी म्हणत होतं की विराटची स्वप्न बघणाऱ्या पोरींनो तुमची लग्न तर कोणत्यातरी जेठालालशी होणार आहे.

 

विराट अनुष्काच्या लग्नाचे फोटो बघताच सगळ्या आई ओरडल्या की किमान आज तरी दाढी करायची होती याने. हाहाहा ! शेवटी दिल्लीची असो किंवा मुंबईतली आई आईच राहणार.

 

आपल्याकडची मुलं काय करतील याचा नेम नाही. एकाने तर लग्नाला यायला जमलं नाही म्हणून विराटची माफी मागितली आणि  एकाने तर लग्नाची पार्टीपण मागितली.

 

अनुष्काच्या बहिणींनी म्हणे विराट भाओजींचे बूट लपवण्याऐवजी बॅट लपवली होती .

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हणे विराट आणि अनुष्काला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आणि ३१ डिसेंबर आधी आधार कार्डला मॅरेज सर्टिफिकेट जोडण्याचा सल्लाही दिला. काय राव यांनी पंतप्रधानांनाही सोडलं नाही रे.

 

महफिल मैं तेरी हम ना रहे तो गम तो नहीं है, गम तो नहीं हैं, असं म्हणत विराटला लग्नाची मागणी घालणारं ट्विट करणारी महिला क्रिकेटर डॅनियल वॅट हिने त्याला एका शब्दात लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. माफ कर मैत्रिणी तुझा चान्स तर गेला. 

देखो शर्माजी के लडकीने भी शादी कर ली, असं म्हणत दिल्लीतल्या सर्व मुलींच्या आई आता आपल्या पोरींच्या मागे लग्नाचा तगादा लावतील.

 आता विराटच्या मागेही सुरु होईल...कुठे चाललात?आज घरी कधी येणार?प्रत्येक मॅचला जायलाच हवं का?दर वेळेस शतक कशाला काढता?बाकी कोणाला खेळता येत नाही का? तुम्ही काय मक्ता घेतलाय का?नेमकं माझ्या/लग्नाच्या वाढदिवसालाच बरी असते तुमची मॅच?पाऊस पडला तर लवकर घरी या.त्या चिअर लिडर्सकडे कशाला तुमचे लक्ष, आता झालंय ना लग्न, शोभतं का तुम्हाला! इत्यादी इत्यादी

अनुष्काला शुभेच्छा द्यायला म्हणे रणबीर कपूरही इटलीला हजर होता.

टॅग्स :Virushka Weddingविरूष्का वेडिंगSocial Viralसोशल व्हायरलVirat Kohliविराट कोहलीAnushka Sharmaअनुष्का शर्माVirat Anushka Weddingविराट अनुष्का लग्न