शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मांजरीचं पिल्लू की मानवी अर्भक, सत्य ऐकून तुम्हीही व्हाल थक्क  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 15:06 IST

मलेशियात तथाकथित जन्माला आलेलं हे बाळ पाहून आपल्याला ते अजिबात गोड-गोंडस वाटणार नाही.

ठळक मुद्देसोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका फोटोबाबात सध्या फार चर्चा  होत आहे.हा फोटो पाहून प्रत्येकाने कुतूहल व्यक्त केलंय तर अनेक जण संभ्रमात आहेत.कोणीतरी हा फोटो डाऊनलोड करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

मलेशिया - सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका फोटोबाबात फार चर्चा सध्या होत आहे. या फोटोत मांजर आहे की माणसाचं लहान मुल याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम आहे. कारण हा फोटो पाहून प्रत्येकाने कुतूहल व्यक्त केलंय. मांजर माणसाच्या रुपात जन्माला आलं आहे की, बाळाने एखादं रौद्ररुप धारण केलं आहे, याबाबतचा छडा लावण्यासाठी अनेकांनी फार संशोधन केलं. याबाबतचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या मांजरीचा जन्म मलेशियातील पहंग या  गावात झाला आहे आणि पुढील संशोधनासाठी त्याला एका लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे.

पण मलेशियातील पोलिसांनी हे सगळं प्रकरण चुकीचं असून सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो कोणीतरी मुद्दाम व्हायरल केला असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे या फोटोत मांजराचं पिल्लू किंवा लहान बाळ नसून हे केवळ एक खेळणं आहे. या खेळण्याचा फोटो काढून लोकांची दिशाभूल करण्यासाठीच कोणीतरी हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे एका लहान बाळाच्या डोक्यावर आणि पाठीवर केस आहेत. त्याचप्रमाणे एखाद्या राक्षसाप्रमाणे दातही बाहेर आलेले आहेत. हा फोटो इतका भयानक आहे की, फोटो पाहताच प्रत्येकजण अवाक् होतो. सिलिकॉन बेबी वेयरवुल्‍फ नावाच्या या खेळण्याची ऑनलाईन विक्री होत आहे. त्यामुळे कोणीतरी फोटो डाऊनलोड करून सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. अशा कोणत्याही फोटोवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन मलेशियातील पोलिसांनी केलं आहे.

सौजन्य - www.dailymail.co.uk

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयnew born babyनवजात अर्भक