प्रेम आंधळं असतं हे वाक्य आपण अनेकदा विविध लोकांकडून ऐकतो. पण हल्लीचं प्रेम हे खूपच मॉडर्न झालं आहे. याचं एक ताजं उदाहरण सध्या चर्चेत आहे. एका अजब गजब लव्ह स्टोरीची (Unique Love Story) सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. या लव्ह स्टोरीमध्ये तीन जण असून त्यातील कपल घटस्फोटित आहे. तुम्हाला वाटेल की, लव्ह ट्रँगल प्रकरण तर बहुतांश ठिकाणी असते. पण यात घटस्फोटानंतर पती आणि पत्नी दोघांनाही एकाच मुलीवर प्रेम जडले (Throuple Relationship), हा त्यातला अजब भाग आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
अमेरिकेतील रहिवासी जोशुआ अल्कोन (Joshua Alcon) आणि त्याची माजी पत्नी जेसिका (Jessica) यांचा काही काळापूर्वी घटस्फोट झाला. त्यांना चार मुलेही आहेत. यात अजब खेळ म्हणजे, हे दोघे घटस्फोट झाल्यावर वेगळे झाले. दोघांनाही एका डेटिंग अॅपवर अॅबी नावाची एक सुंदर मुलगी भेटली. जोशुआ अॅबीच्या प्रेमात पडला आणि अॅबीलाही तो आवडू लागला.
कहानी में ट्विस्ट...
इथेच नव्या लव्ह स्टोरीमध्ये ट्विस्ट आला. जेसिका देखील त्याच डेटिंग अॅपवर होती. तिला अॅबी आवडली. जेसिकाने अॅबीला संपर्क केला आणि आपल्या प्रेमाची कबुली दिली. अॅबीलाही जेसिका आवडली. त्यानंतर पुढे खूपच अजब गोष्ट घडली.
EX पत्नी पुन्हा गरोदर
mirror.co.uk नुसार, आता घटस्फोटित पती-पत्नी आणि त्यांची 'कॉमन गर्लफ्रेंड' अॅबी तिघे एकत्र, एकाच छताखाली राहत आहेत. यात नवीन अपडेट असा की, घटस्फोट घेणारी जेसिका आता पुन्हा आपला पती जोशुआपासून गर्भवती आहे आणि तिच्या त्यांच्या पाचव्या बाळाला जन्म देणार आहे. तिने सांगितले की, येणाऱ्या मुलाला अॅबीचे मिडल नेम (मधले नाव) दिले जाईल.
तिघेही एकत्र आनंदी
जेसिकाने ‘My Extraordinary Life Truly’ या युट्यूब चॅनलवर तिच्या थ्रपल रिलेशनशिपचा खुलासा केला. या रिलेशनशिपमुळे इंटरनेटवर वादविवाद सुरू झाला आहे. लोक याला विचित्र, अनैतिक म्हणत आहेत. परंतु जोशुआ, जेसिका आणि अॅबी याकडे दुर्लक्ष करत एकमेकांची काळजी घेताना दिसतात.