नवी दिल्ली - आत्तापर्यंत आपण, असे अनेक लोक पाहिले असतील, जे रात्री व्यवस्थित झोप होत नसल्याने त्रस्त असतील (Insomnia Symptoms). एवढेच नाही तर, दिवस असो वा रात्र, नेहमीच झोपा काढणारे लोकही आपण पाहिले असतील. पण, चीनमध्ये राहणारी एक महिला गेली तब्बल 40 वर्षांत एक क्षणही झोपलेली नाही, हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. तर वाचा, ही व्हायरल होत असलेली विचित्र बातमी. (viral news weird news china woman wide awake since 40 years)
झोप येत नसल्याने महिला अस्वस्थ -चीनमधील हेनान (Henan) प्रांतातील रहिवासी ली झानयिंग (Li Zhanying)या झोप न येण्याच्या विचित्र आजाराने (Weird Disease) त्रस्त आहेत. सध्या त्या 45-46 वर्षांच्या आहेत. तसेच आपण गेल्या 40 वर्षां एक मिनिटही झोपलेलो नाही, असा दावा त्यांनी केला आहे. त्या शेवटच्या झोपल्या, तेव्हा त्यांचे वय 5 ते 6 वर्षं एवढे होते.
बॉयफ्रेंडने दिला धोका! पुन्हा चॅट करण्यासाठी चार्ज करते भरमसाठ फी, इतकी की पुन्हा चूक करेल तर शप्पथ!
लग्नानंतर पतीही हैराण -ली झानयिंगचा पती लियू सुओक्विन (Liu Suoquin) यांनी लीच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. आजपर्यंत आपण आपल्या पत्नीला कधीही झोपलेले पाहिले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर ली रात्री वेळ घालविण्यासाठी घरातील कामे करत राहते. सुरुवातीला, लियू यांनी त्यांच्यासाठी झोपेच्या गोळ्याही आणल्या. पण ली यांना त्यांचाही फायदा झाला नाही.
लग्नापूर्वी नवऱ्याला चाबकाचे फटके देण्याची प्रथा; वेदना सहन न झाल्यास...
गावातही लोकप्रिय आहेत ली -ली त्याच्या गावातही प्रचंड लोकप्रिय आहेत. बऱ्याच वेळा जवळ राहणारे लोक त्यांची परीक्षा घेण्यासाठी रात्री त्यांच्या घराबाहेर बसून पत्ते खेळतात. नंतर, त्यांना स्वतःलाच झोप येते. पण ली जागीच असतात. ली यांना अनेक डॉक्टरांना दाखविण्यात आले आहे. मात्र, त्याच्या या विचित्र आजारावरील उपचार अथवा कारण अद्यापही समजू शकलेले नाही.