शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

गजब! बॉयफ्रेंड बनवण्यासाठी मुलीने काढले फॉर्म, २४ तासांत ३ हजार मुलांनी अर्ज केला दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 14:39 IST

लंडनमध्ये राहणारी एक सुंदर मुलगी स्वतःसाठी बॉयफ्रेंड शोधत आहे आणि त्यासाठी तिने एक फॉर्म काढला आहे.

आजच्या काळात चांगली नोकरी मिळणे किती कठीण आहे याची जाणीव तुम्हाला असेलच. तुम्ही पाहिलं असेल की अनेक वेळा एखाद्या कंपनीत फक्त एक किंवा दोन पदांसाठी जागा रिक्‍त होते, पण हजारो लोक त्यासाठी अर्ज करतात. आता कंपनी त्यांच्यामधून योग्य उमेदवार निवडते आणि त्याला कामावर ठेवते, पण तुम्ही कधी ऐकले आहे का एखाद्या मुलीने किंवा महिलेने बॉयफ्रेंड मिळवण्यासाठी फॉर्म काढले आहेत आणि लोकांनी त्यासाठी अर्जही केला आहे? होय, सध्या अशीच एक मुलगी चर्चेत आहे, जी तिचा बॉयफ्रेंड निवडण्यासाठी एक अनोखा फॉर्म घेऊन आली आहे आणि विशेष म्हणजे हजारो तरुणांनी तिचा बॉयफ्रेंड बनण्यासाठी अर्ज केला आहे.

चंद्रावर कबर असलेला एकुलता एक माणूस, जाणून घ्या कोण आहे तो!

वीरा डिजकमन्स असे या मुलीचे नाव आहे. ती व्यवसायाने मॉडेल आणि टिकटॉकर देखील आहे आणि ती लंडनची रहिवासी आहे.  मुले आणि मुली आपला जोडीदार शोधण्यासाठी डेटिंग अॅप्सची मदत घेतात, पण या मुलीने वेगळी पद्धत अवलंबली आहे. सरकारी नोकऱ्यांप्रमाणे तिने स्वतः फॉर्म काढला आणि मुलांकडून अर्ज मागवायला सुरुवात केली.

मेट्रो नावाच्या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, वीराने बॉयफ्रेंड बनवण्यासाठी फॉर्म काढताच मुलांची लाईन सुरू झाली. वीराने सांगितले की, अवघ्या 24 तासांत तिच्याकडे सुमारे 3 हजार अर्ज आले, म्हणजेच इतक्या मुलांनी तिचा बॉयफ्रेंड होण्यासाठी अर्ज केला. तथापि, आता वीरा त्यांच्यापैकी एक चांगला उमेदवार निवडेल आणि त्याला तिचा प्रियकर बनवेल, जो तिच्या सर्व अटी पूर्ण करेल.

वीरा म्हणते की, ती अविवाहित राहून कंटाळली आहे आणि आता जोडीदाराच्या शोधात आहे. जी मुले स्वतःला तिचा बॉयफ्रेंड होण्यासाठी पात्र समजतात ते अर्ज करू शकतात. तिने काढलेल्या फॉर्ममध्ये लोकांना त्यांची वैयक्तिक माहिती विचारण्यात आली आहे. यासोबतच काही प्रश्नही विचारण्यात आले आहेत, ज्यांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. वीरा म्हणते की, जो कोणी तिचा प्रियकर होईल, त्याने स्वावलंबी असणे आवश्यक आहे आणि त्याला व्यंगचित्रांची आवड असणे आवश्यक आहे.

सध्या या फॉर्मची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेकांनी यासाठी फॉर्म भरले आहेत, तर काहींनी सोशल मीडियावर खिल्ली उडवली आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके