शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

VIP बेडरुम स्क्रीन; ना सीट ना सोफा, डायरेक्ट डबल बेड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 01:31 IST

कुठेही जा सिनेमागृह म्हटल्यावर खूपसाऱ्या खुर्च्या आणि समोर मोठ्ठा पडदा असं चित्र असतं. काही ठराविक सिनेमागृहांमध्ये मोजक्या आणि मोठ्या आकाराच्या आरामदायी खुर्च्या असतात.

कुठेही जा सिनेमागृह म्हटल्यावर खूपसाऱ्या खुर्च्या आणि समोर मोठ्ठा पडदा असं चित्र असतं. काही ठराविक सिनेमागृहांमध्ये मोजक्या आणि मोठ्या आकाराच्या आरामदायी खुर्च्या असतात. पण आता यापलिकडे जाऊन एका सिनेमागृहात डबल बेड लावण्यात आले आहे.स्वित्झर्लंडच्या एका सिनेमागृहात पारंपारिक खुर्च्यांना हद्दपार करून आता डबल बेड लावले आहेत. म्हणजे लोकांना आता आरामात झोपून सिनेमे बघता येणार आहे. या अनोख्या स्क्रीनची सुरूवात नुकतीच येथील एका सिनेमागृहात करण्यात आली आहे. याआधी सोफा सीट ही पद्धत आहेच. पण आता बेड लावण्यात येत आहेत.प्रेक्षकांना अनोखा अनुभव आणि त्यांना आरामात घरी जसं निवांत बसून किंवा झोपून सिनेमा बघता येतो तसा अनुभव देण्यासाठी ही संकल्पना समोर आली आहे. सामान्यपणे सिनेमागृहातील स्वच्छतेचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. पण इथे सिनेमागृह मालकांनी याची काळजी घेतली आहे. इथे प्रत्येक शोनंतर बेडशिट बदलल्या जाणार आहेत. स्वच्छता आमच्यासाठी प्राधान्य असणार असेही त्यांनी सांगितले.या वेगळ्या संकल्पनेची चाचणी घेण्यात आली आणि हे लोकांना आवडेल, अशी आशा सिनेमागृहाने व्यक्त केली आहे. या व्हिआयपी बेडरूम स्क्रीनमध्ये ११ डबल बेड असणार आहेत आणि तसेच हे बेड अ‍ॅडजस्टही करता येणारे आहेत. आता नक्कीच सर्वांना प्रश्न पडला असेल की, याचं तिकिट किती असणार आहे. तर याचं तिकीट स्वित्झर्लॅंडच्या करन्सीनुसार ४ फ्रँकस् म्हणजेच भारतीय करन्सीनुसार ३ हजार ३०० रूपयांपेक्षा अधिक असेल.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके