शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : या रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी नाहीतर चापटा मारून घेण्यासाठी येतात लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 10:25 IST

जपानच्या नागोयाचं एक रेस्टॉरंट आपल्या जेवणामुळे नाही तर एका अजब सेवेमुळे फेमस झालं आहे. 

जगभरातील रेस्टॉरंट नेहमीच ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवनवीन काहीतरी करत असतात. ग्राहकांना चांगलं वातावरण आणि स्वादिष्ट जेवण देण्यासोबतच रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळे प्रयोग  केले जातात. पण जपानच्या नागोयाचं एक रेस्टॉरंट आपल्या जेवणामुळे नाही तर एका अजब सेवेमुळे फेमस झालं आहे. 

शाचिहोको-या इजाकाया नावाच्या या रेस्टॉरंटची वेट्रेस ग्राहकांचं स्वागत त्यांना गालावर चापटा मारून करते. हे रेस्टॉरंट नागोयाच्या सगळ्यात लोकप्रिय नाइटलाइफ क्वार्टर निशिकी सांचोममध्ये आहे. इथे किमोनो पोषाख घातलेल्या महिला ग्राहकांच्या चेहऱ्यावर लागोपाठ चापटा मारतात. या सेवेसाठी ग्राहकांना 300 येन द्यावे लागतात.

असं म्हटलं जातं की, या रेस्टॉरंटचा बिझनेस नुकताच फार वाढला आहे. केवळ जपानी पुरूष-महिला नाहीतर परदेशातील लोकही या वेदनादायी सेवेचा अनुभव घेण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये येतात.

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, जर ग्राहकांना एखाद्या खास वेट्रेसकडून चापटा मारून घ्यायच्या असतील तर यासाठी त्यांना 500 येन द्यावे लागतात.असं सांगण्यात येतं की, चापटा खाल्ल्यानंतर ग्राहक संतापण्याऐवजी आनंदी दिसतात. स्थानिक मीडियात असा दावा करण्यात आला की, अशा वेदनादायी अनुभवानंतर काही लोकांना शांततेची जाणीव होते.

चीनमधील मीडिया पब्लिकेशन लिबर्टी टाइम्स नेटच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला की, जेवढ्या जोरात महिला कर्मचारी चापटा मारतात, ग्राहक तेवढे जास्त उत्साहित झाले. त्यांना अधिक आराम वाटला आणि चापटा मारल्यानंतर स्टाफला धन्यवाद दिले.

पण गेल्या काही दिवसांआधीच या रेस्टॉरंटने चापटा मारण्याची ही सेवा बंद केली आहे. असं सांगण्यात आलं की, सोशल मीडियावर रेस्टोरेंटचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्यावर स्थानिक प्रशासनाचं याकडे लक्ष गेल्याने रेस्टॉरंटने असं केलं. रेस्टॉरंटने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लोकांना आवाहन केलं की, त्यांनी चापटा मारून घेण्यासाठी इथे येऊ नये.

टॅग्स :JapanजपानJara hatkeजरा हटके