शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

VIDEO: ईद दिवशी पाकिस्तानी पत्रकाराने घेतली म्हशीची मुलाखत, प्रश्नोत्तरं ऐकून हसू आवरता येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 13:21 IST

Pakistani journalist interviews buffalo: पाकिस्तानमधील प्रसिद्ध पत्रकार अमिन हफिझ यांचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इस्लामाबाद - जगभरातील पत्रकार हे त्यांच्या दर्जेदार कामामुळे चर्चेत येत असतात. मात्र पाकिस्तानमधीलपत्रकारांची बातच और आहे. येथील पत्रकार प्राण्यांच्या मुलाखतींमुळे चर्चेत येत असतात. आता पाकिस्तानमधील प्रसिद्ध पत्रकार अमिन हफिझ यांचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्हाला आठवत असेल तर याच पत्रकार महोदयांनी काही काळापूर्वी एका गाढवाची मुलाखत घेतली होती. आता हफिझ यांनी ईदच्या निमित्ताने एका म्हशीची मुलाखत घेतली आहे. तसेच या म्हशीनेसुद्धा त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहे. सवाल-जवाबामुळे गाजलेली मुलाखत सध्या सोशच मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. (Pakistani journalist interviews buffalo on Eid day, can't stop laughing after listening to questions and answers)

नायला इनायत नावाच्या तरुणीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पत्रकार हाफिझ एका म्हशीसमोर माईक नेऊन तिला प्रश्न विचारताना दिसत आहे. तुम्हाला लाहोर शहरात येऊन कसं वाटतंय, असा प्रश्न विचारला असता म्हशीने दिलेले उत्तर ऐकून पत्रकाराच्या आनंदाला पारावार उललेला नाही, असे दिसत आहे. ते म्हणतात ही म्हैस सांगतेय की, लाहोर चांगले वाटत आहे.

त्यानंतर हाफिझ म्हशीला विचारतात की, लाहोरमधील भोजन चांगले आहे की, तुमच्या गावातील भोजन चांगले आहे. या प्रश्नावर  उत्तर देताना म्हशीने दिलेले उत्तर ऐकून हाफिझ अजूनच आनंदित होतात. ते सांगतात की, म्हैस म्हणतेय हो लाहोरचं भोजन अधिक चांगलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, एक युझर लिहितो की, हो खरोखरच पाकिस्तान एक आश्चर्यकारक ठिकाण आहे, इथे काहीही होऊ शकते.

सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ८ हजारांहून अधिक लोकांना पाहिले आहे. तसेच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. तसेच या व्हिडीओवरून नेटिझन्स पत्रकार हाफिझ यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. एका युझरने लिहिले की हे तेच पत्रकार आहेत ज्यांचा प्राण्यांच्या मुलाखती घेण्यामध्ये हातखंडा आहे.   

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेPakistanपाकिस्तानJournalistपत्रकार