शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Video: सरकारी कर्मचाऱ्याच्या कामाचा वेग पागून IPS अधिकारी झाला अवाक्, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 12:34 IST

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मशीनपेक्षा जास्त वेगाने काम करताना दिसत आहे.

सरकारी नोकरीचे स्वप्न अनेकजण पाहतात, प्रत्येकाला चांगली सरकारी नोकरी असावी वाटते. सरकारी नोकरीमध्ये संपूर्ण आयुष्य आरामात घालवता येते. यात नोकरी जाण्याचा धोका नसतो किंवा कामाचा दबावही नसतो. त्यामुळेच तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, सरकारी कार्यालयातील कर्मचारी आरामात आणि त्यांच्या सोयीनुसार काम करतात. पण, सध्या एका सरकारी कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात त्याच्या कामाचा वेग पाहून तुम्ही चकीत होऊन जाल. हा कर्मचारी मशीनपेक्षा जास्त वेगाने काम करत आहे.

हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सरकारी कार्यालयातील कर्मचारी एवढ्या वेगाने काम करत आहे, याचा विश्वास अनेकांना बसत नाहीये. हा व्हिडिओ IPS अधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे - 'खाजगीकरणाच्या बातम्या ऐकून सरकारी कामाच्या कार्यक्षमतेत अभूतपूर्व वाढ...'

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती टेबलावर बसून मशीनच्या वेगाने कागदावर शिक्के मारत आहे. हे बघून जणू यंत्र चालूच आहे, असे वाटत आहे. रुपिन शर्मांनी व्हिडिओमध्ये अनेकांना टॅगही केले आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ आत्तापर्यंत 3 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंटही करत आहेत. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके