शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरने कबरेतून तरूणीचा मृतदेह काढला, मग सात वर्ष नवरी बनवून आपल्यासोबत ठेवला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 15:25 IST

Doctor Lived With Dead Body : अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहणारे डॉ. डेथ नावाने प्रसिद्ध कार्ल तंजलर यांनी एकदा एका तरूणीचा मृतदेह कबरेतून चोरी केला आणि तिला नवरी बनवून अनेक वर्ष आपल्याजवळ ठेवला. 

Doctor Lived With Dead Body : प्रेम एक फार चांगली जाणीव आहे. पण अनेक प्रेमकथा नेहमी चांगल्या असतात असं नाही. अशाच एका डॉक्टरची एक अजब प्रेमकथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहणारे डॉ. डेथ नावाने प्रसिद्ध कार्ल तंजलर यांनी एकदा एका तरूणीचा मृतदेह कबरेतून चोरी केला आणि तिला नवरी बनवून अनेक वर्ष आपल्याजवळ ठेवला. 

डॉ. कार्ल तंजलर यांनी मृतदेह संरक्षित केला आणि तिचे डोळे काचाचे केले आणि चेहऱ्यावर मास्क लावला. जोपर्यंत मृत महिलेच्या कुटुबियांना हे समजलं नाही तोपर्यंत महिलेचा मृतदेह सात वर्ष डॉक्टरने नवरी बनवून आपल्याजवळ ठेवला. कारण तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. त्यानंतर पोलिसांना सूचना देण्यात आली.

मारिया एलेबा मिलाग्रो डी होयोस या मृत महिलेला आपली प्रेयसी मानणारा डॉक्टर जेव्हाही तिचे डोळे बघत होता तेव्हा तो हैराण होत होता. ती त्याची पेंशट होती. त्याला असं वाटलं की, तो या महिलेवर खरं प्रेम करतो. जिवंत असताना ती त्याला भेटू शकली नाही म्हणून त्याने तिचा मृतदेह एका खास ठिकाणी ठेवला आणि तिला नवरी बनवून ठेवलं. 

जेव्हा हे पोलिसांसमोर आलं तेव्हा त्यांना ताब्यात घेण्यात आलं. पण कायदेशीर त्रुटींमुळे त्यांच्यावर कधीही केस केली गेली नाही. ऐलेनाचा परिवार मुलीचा मृतदेह पाहून घाबरले होते आणि तिच्या बहिणीने कोर्टात सांगितलं होतं की, ही तिच्या जीवनातील आतापर्यंतची सगळ्यात अजब घटना आहे.डॉक्टरला विश्वास होता की, तो एक दिवस ऐलेनाला आपल्या जीवनात परत आणेल, त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. त्याने मृतदेहावर अनेक प्रयोग केले. डॉक्टर तंजलरची भेट 21 वर्षीय ऐलेनासोबत तेव्हा झाली होती जेव्हा ती वेस्ट फ्लोरिडाच्या एका हॉस्पिटलमध्ये त्याची पेशंट होती. 

जर्मनीमध्ये जन्माला आलेले डॉक्टर तंजलर तिच्यावर उपचार करत होते. डॉ कार्ल तंजलर यांचा जन्म 1877 मध्ये ड्रेसडेनमध्ये झाला होता. पण पहिल्या महायुद्धानंतर ते यूएसला आले. तिथे त्यांनी काउंट कार्ल वॉन कोसेल नावाने लोकप्रियता मिळवली. त्यांचा दावा होता की, त्यांच्याकडे विश्वविद्यालयाच्या 9 डिग्री आहेत. त्यांनी दावा केला होता की, त्यांना काही स्वप्न दिसत होते ज्यात दिसणारी तरूणी ही ऐलेनासारखीच होती. त्यामुळे ते तिच्या मागे लागले होते.

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटकेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट