शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलच! एकाच झाड्याला येतात १२१ प्रकारचे आंबे; पाहणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 15:27 IST

१० वर्षांपूर्वी कलम करण्यात आलेल्या आंब्याच्या झाडाची आता पंचक्रोशीत चर्चा

सहारनपूर: तब्बल २ लाख ७० हजारांचा असलेला एक आंबा गेल्या महिन्यात चर्चेत होता. अतिशय मौल्यवान आंब्याच्या सुरक्षेसाठी कुत्रे आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आल्याची मध्य प्रदेशातून समोर आली होती. यानंतर आता उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधील आंब्याचं एक झाड चर्चेत आलं आहे. या आंब्याला एक, दोन नव्हे, तर तब्बल १२१ प्रकारचे आंबे लागले आहेत. या आंब्याची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे. जवळपास १० वर्षांच्या मेहनतीमधून आंब्याचं अनोखं झाडं तयार झालं आहे.

सहारनपूरच्या मधोमध कंपनी बाग परिसर आहे. या बागेत विविध प्रकारची झाडं आहेत. या मुघलकालीन बागेत विविध शोध आणि बागकामेचं प्रशिक्षण देण्यात येतं. याच बागेत एक अनोखं झाडं आहे. या झाडाला १२१ प्रकारचे आंबे येतात. १० वर्षांपूर्वी या आंब्याच्या फांद्या कलम करण्यात आल्या. तिथे जोडण्यात आलेल्या फांद्यांना आता आंबे येऊ लागले आहेत. 

सहारनपूर आंब्याच्या नव्या नव्या प्रजातींचा शोध लागला आहे. जवळपास १० वर्षांपूर्वी कंपनी बागेत असलेल्या उद्यान प्रयोग आणि प्रशिक्षण केंद्राचे तत्कालीन संयुक्त संचालक राजेश प्रसाद यांनी आंब्याच्या एका झाडावर १२१ फांद्या लावल्या. या आंब्या विविध प्रजातीच्या आंब्याच्या होत्या. दहा वर्ष वयोमान असलेल्या आंब्याच्या झाडाची त्यांनी या प्रयोगासाठी निवड केली. या आंब्याच्या झाडाच्या देखभालीसाठी एक स्वतंत्र नर्सरी इंचार्ज नियुक्त करण्यात आला.

एकाच झाडावर तब्बल १२१ प्रकारचे आंबेकंपनी बागेतील आंब्याच्या झाडावर दशहरी, चौंसा, लंगडा, रामकेला, आम्रपाली, सहारनपूर अरुण, सहारणपूर वरुण, सहारणपूर सौरभ, सहारणपूर गौरव, सहारणपूर राजीव, लखनऊ सफेदा, टॉमी एट किंग्स, पूसा सूर्या, सेन्सेशन, रटोल, कलमी मालदा, स्मिथ, मँगीफेरा जालोनिया, गोला बुलंदशहर, लरन्कू, एलआर स्पेशल, आलमपूर बेनिशा, असौजिया देवबंद यांच्यासह आणखी विविध प्रकारचे आंबे लागतात.