शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

लग्न करण्यासाठी इथे पुरूष चोरून आणतात दुसऱ्याची बायको, महिलेच्या सहमतीनेच होतं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 15:26 IST

Marriage Weird Tradition : आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल, पण इथे दुसरं लग्न करण्यासाठी व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची पत्नी चोरून आणणं बंधनकारक असतं.

Marriage Weird Tradition : जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये अनेक आदिवासी जमाती राहतात. हे लोक आजही त्यांच्या जुन्या परंपरा आणि प्रथा फॉलो करतात. त्यांची लाइफस्टाईल, कपडे, खाणं-पिणं आणि लग्नाचे रिवाजही वेगळे असतात. पश्चिम आफ्रिकेतील वोदाब्बे (Wodaabe) आदिवासी जमातही खूप वेगळी आहे. त्यांच्यातील लग्नाची परंपरा अनोखी आणि हैराण करणारी आहे. आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल, पण इथे दुसरं लग्न करण्यासाठी व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची पत्नी चोरून आणणं बंधनकारक असतं.

वोदाब्बे जमातीमध्ये तरूण-तरूणींचं लग्न कुटुंबियांच्या सहमतीनं लावून दिलं जातं. घरातील लोक ठरवतात की, त्यांची मुलगी किंवा मुलाचं लग्न कुणासोबत होणार. पण जर एखाद्या व्यक्तीला दुसरं लग्न करायचं असेल तर त्यासाठी अजब नियम आहे. पत्नी चोरी करणं हा दुसऱ्या लग्नाचा नियम आहे.

दरवर्षी या लोकांकडून एक खास उत्सव साजरा केला जातो. ज्याला गेरेवोल असं म्हणतात. हा उत्सव खासकरून पुरूषांसाठी असतो. यात ते श्रृंगार करतात, रंगीबेरंगी कपडे घालतात आणि चेहऱ्यावर रंगरंगोटी करतात. त्यानंतर पारंपारिक नृत्य करत दुसऱ्यांच्या पत्नीना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात. महत्वाची बाब म्हणजे या उत्सवाचा उद्देशच हा असतो की, जर एखादी दुसऱ्याची पत्नी दुसऱ्या पुरूषाकडे आकर्षित झाली तर ती त्याच्यासोबत पळून जाऊ शकते. हीच गोष्ट लग्न म्हणून स्वीकार केली जाते.

या समाजातील लोकांचं मत आहे की, एका पुरूषाचं आकर्षण, आत्मविश्वास आणि व्यक्तीत्व या गोष्टीवरून ठरतं की, तो किती महिलांना आकर्षित करू शकतो. दुसऱ्याची पत्नी चोरी करणं त्यांच्या संस्कृतीत एकप्रकारे परीक्षा आहे. पण त्यात महिलेची सहमती आवश्यक असते. एकीकडे जग आधुनिकतेकडे जात आहेत. या समाजातील लोक आजही आपल्या जुन्या परंपरा पार पाडतात. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके