ऑफिसमधील वाद किंवा अजब नियम नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. कधी बॉस कर्मचाऱ्यांवर चांगलाच संतापतो, तर कधी एखाद्या कामावर खूश होऊन कौतुकही करतात. अनेक अशा घटना असतात ज्या वाचल्यावर हसायलाही येतं. तर काही विचार करायला भाग पाडतात. अशीच एक ऑफिसमधील घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
स्पोर्ट्स शूजमुळे गेली नोकरी
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एक तरूणी ऑफिसमध्ये स्पोर्ट शूज घालून गेली होती. ज्यामुळे तिला तिची नोकरी गमवावी लागली. यूनायटेड किंगडममधील ही घटना आहे. ही घटना समोर आल्यावर लोकांनीही यावर आश्चर्य व्यक्त केलं. यूकेली २० वर्षीय एलिझाबेथ बेनासी हिला शूजमुळे नोकरीहून काढण्यात आलं. ती ऑफिसमध्ये स्पोर्ट शूज घालून गेली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एलिझाबेथ बेनासीनं सांगितलं की, तिला त्या ऑफिसमधील कोणत्या ड्रेस कोडबाबत माहीत नव्हतं. मॅक्सिमम यूके सर्व्हिसेसची ही माजी कर्मचारी तरूणी म्हणाली की, कंपनीचा उद्देश तिला काढणं होता. मात्र, जेव्हा हे प्रकरम पुढे कोर्टात गेलं तेव्हा निर्णय तरूणीच्या बाजूनं लागला.
कोर्टानं तरूणीची बाजू घेत सांगितलं की, कंपनीनं तरूणीला चूक शोधून नोकरीहून काढलं. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर एलिझाबेथला 30,000 पाउंड म्हणजेच 32,20,818 रूपये नुकसान भरपाई म्हणून मिळाले. तर कंपनीनं कोणतंही चुकीचं काम केल्याचा नकार दिला.