शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

या हुकूमशहाने क्रूरतेची सीमा केली होती पार, फ्रीजमध्ये ठेवत होता कापलेले मानवी शीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 09:42 IST

असे अनेक लोक असतात ज्यांचं वागणं आणि आवडी राक्षसासारख्या असतात. असाच एक व्यक्ती म्हणजे युगांडाचा हुकूमशहा ईदी अमीन.

दिल्लीमध्ये झालेल्या श्रद्धा मर्डर केसने सगळ्यांचा हादरवून सोडलं आहे. या केसमधील आरोपी आफताबचे कृत्य जसजसे समोर येत आहेत, लोक ऐकून हैराण होत आहेत. पोलिसांनी सांगितलं की,  आफताब दररोज रात्री फ्रिजमध्ये ठेवलेलं श्रद्धाचं कापलेलं शीर बघत होता. लोक तर हैराण झाले आहेत की, एक तरूण इतका क्रूर असू शकतो. पण क्रूरतेचा हा एकच किस्सा नाहीये. असे अनेक लोक असतात ज्यांचं वागणं आणि आवडी राक्षसासारख्या असतात. असाच एक व्यक्ती म्हणजे युगांडाचा हुकूमशहा ईदी अमीन. ईदीला मानवांचे शीर कापून ठेवणे आणि मानवी मांस खाण्याची आवड होती.

युगांडाचे मंत्री हेनरी क्येम्बा यांच्या त्यांच्या ‘द स्टेट ऑफ ब्लड: द इनसाइड स्टोरी ऑफ ईदी अमीन’ (State of Blood: The Inside Story of Idi Amin) पुस्तकात ईदी अमीनचे अनेक किस्से लिहिले आहेत. त्यांनी लिहिलं की, कशाप्रकारे ईदी अमीनला मानवी मांस खाणं पसंत होतं. अमीनच्या कार्यकाळा दरम्यान युगांडामध्ये भारतीय राजदूत राहिलेले मदनजीत सिंह यांनीही त्यांच्या पुस्तकात उल्लेख केला की, ईदी अमीन कापलेले मानवी शीर फ्रिजमध्ये ठेवत होता.

ईदी अमीनने  1971 मध्ये मिल्टन ओबोटेला हटवून सत्ता स्थापन केली होती. 4 ऑगस्ट 1972 ला ईदी अमीनने अचानक आदेश दिला की, सगळ्या आशियाई लोकांनी लगेच युगांडा सोडावं. त्याचं म्हणणं होतं की, त्याला अल्लाहने स्वप्नात सांगितलं की, त्याने युगांडातून सगळ्या आशियाई लोकांना बाहेर काढावं. 

हेनरी क्येम्बा यांनी पुस्तकात लिहिलं की, ईदी आधी त्याच्या दुश्मनांना मारत असे आणि नंतर त्यांच्या मृतदेहासोबत गैरकृत्य करत होता. ईदी मारलेल्या लोकांजवळ काही वेळ एकटाच थांबत असे. ईदी अमीन हा काकवा जमातीचा होता. असं मानलं जातं की, या जमातीचे लोक त्यांच्या दुश्मनांचं रक्त पित होते. त्यांनी लिहिलं की, ईदी अमीन मानवी मांस खात असे. त्यांनी हेही सांगितलं की, ईदी अमीनचा एक नोकर मोजेज अलोगा कीवियाला पळून गेला होता. त्यानेही ईदीबाबत अनेक खुलासे केले होते.

मदनजीत सिंह यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं की, ईदी अमीन त्याच्या घरातील एक खोली नेहमीच बंद ठेवत होता. अमीनची पाचवी पत्नी सारा क्योलाबा एकदा जबरदस्ती त्या खोलीत शिरली होती. तिथे जे दिसलं ते पाहून ती हैराण झाली होती. ईदी अमीनने त्या खोलीत दोन फ्रीज ठेवले होते. ते अमीनच्या पत्नीने उघडून पाहिले. तिला फ्रीजमध्ये काही मानवी शीर कापून ठेवलेले दिसले.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके